वालचंदनगर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या आरोपीला वालचंदनगर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून गावठी देशी बनावटीचे पिस्टल व दोन गोळ्या हस्तगत केल्या आहेत.दिनेश रामचंद्र धायगुडे (रा.सावतामाळी नगर,अंथुर्णे,ता. इंदापूर,जि.पुणे) असे पिस्टल हस्तगत केलेल्या आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी स्थानिक पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत.यावेळी जंक्शन चौक येथे दिनेश धायगुडे हा बेकायदेशीर पिस्टल घेवुन आला असल्याची माहिती मिळाली होती.या माहितीसाठी सदर युवकाला तपासले असता,त्याच्या ताब्यात एक पिस्टल व दोन गोळया मिळून आल्या.
त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता,त्याने आपण रूकेश खरसिद भोसले (रा.सायकरवस्ती,राशिन,ता.कर्जत,जि.अ.नगर याच्याकडून घेतले असल्याचे कबूल केले आहे.त्यानुसार दिनेश धायगुडे याच्यासह रुकेश भोसले याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून,दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग मिलीद मोहिते,
उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनखाली वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरप्पा लातुरे,सहाय्यक फौजदार शिवाजी निकम, पोलीस हवालदार रविंद्र पाटमास,पोलीस नाईक विनोद पवार,
अमर थोरात,पोलीस नाईक यांनी पार पाडली आहे.