राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका.. उपमुख्यमंत्री अजित पवारांची १००० कोटींची संपत्ती जप्त होणार…!!


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

काल रात्री ईडीने १०० कोटींच्या वसुलीप्रकरणावरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची तब्बल १३ तास चौकशी करत,त्यांना अटक केली असतानाच,राष्ट्रवादीला दुसरा जबरदस्त झटका बसला असून,आज सकाळी आयकर विभागाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची १००० कोटींची संपत्ती जप्त करण्याची नोटीस दिली आहे.अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या पाच मालमत्ता जप्त करण्याची नोटीस देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या संबधित असणाऱ्या काही मालमत्ता जप्त करण्यात येणार असून त्या पुढीलप्रमाणे :

१) जरंडेश्वर शुगर फॅक्ट्री
बाजार मूल्य : सुमारे ६०० कोटी

२) साऊथ दिल्लीमधीली फ्लॅट
बाजार मूल्य: सुमारे २० कोटी

३)पार्थ पवार यांचं निर्मल ऑफिस बाजार मूल्य : २५ कोटी

४)निलय नावाने गोव्यात बनलेला रिसॉट बाजार मूल्य: २५० कोटी

५)महाराष्ट्रात २७ वेगवेगळ्या ठिकाणी जमीन
बाजार मूल्य: सुमारे ५०० कोटी

उपमुख्यमंत्री हे काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रांणाच्या रडारवर आहेत.गेल्या दिवसांपूर्वी आयकर विभागाने दोन रिअल इस्टेट ग्रुप आणि अजित पवारांच्या,नातेवाईकांच्या घर आणि कार्यालयांवर छापेमारी केली होती.यावेळी १८४ कोटींची बेनामी मालमत्ता सापडली असून, आयकर विभागाने ७ ऑक्टोबर पासून ७० हून अधिक ठिकाणांवर छापेमारी केली होती. पार्थ पवार यांच्या मालकीच्या अनंत मर्क्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवरही छापा मारला होता. तसेच पवारांच्या बहिणींच्या
मालकीच्या कंपन्यांवरही कारवाई करण्यात आली होती. यामुळे आता ऐन दिवाळीत राजकारण तापणार का ? हे पाहणं देखील महत्त्वाच ठरणार आहे..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *