नवनियुक्त शहर पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांची कामगिरी,जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला केले जेरबंद…!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

बारामती शहराचा चार्ज घेताच, नवनियुक्त पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी बारामती शहरांमध्ये पेट्रोलिंग वाढविण्यासाठी सांगितले असताना,पेट्रोलिंग करताना आरोपी निलेश गणेश मोरे,वय.२२ वर्ष (रा.खंडोबानगर,ता.बारामती,जि.पुणे ) याला ताब्यात घेत त्याच्या ताब्यातील होंडा कंपनीची युनिकॉर्न गाडी ताब्यात घेतली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माळावरची देवी ते जळोचीकडे जाणाऱ्या रोडकडे पेट्रोलिंग करत असताना,रोडवर अंधारात एक इसम एका मोटारसायकलवर संशयितरित्या फिरत असल्याचे निदर्शनास आल्याने,त्याच्याकडे चौकशी केली असता,तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागल्याने त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता,त्याच्याकडे सॅमसंग कंपनीचा मोबाईल हँडसेट मिळून आला,हा मोबाइल हँडसेट हा बारामती पोलीस ठाण्यातील चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे तपासांत निष्पन्न झाले.तसेच त्याच्याकडे मिळून आलेली युनिकॉर्न मोटरसायकल ही इंदापूर पोलीस ठाण्यातील चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे आढळून आले.

ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक,गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके,पोलीस अमलदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जगदाळे,शिंदे,कोळेकर पोलीस कर्मचारी बंडू कोठे,सचिन कोकणे इंगोले,पवार यांनी केली आहे.

बातमी चौकट :

सध्या दिवाळी सण असल्याने बारामती शहरातील सर्व नागरिकांनी योग्य ती दक्षता घेणे गरजेचे आहे.
सुनील महाडिक ( नवनियुक्त पोलीस निरीक्षक बारामती शहर )


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *