सायबाला जाणीवपूर्वक हनी ट्रॅप मध्ये अडकवणारा तो सावकार कोण ? त्या सावकारावर पोलीस प्रशासन मोक्का अंतर्गत कारवाई करणार का ??


साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,अशी नागरिकांत कुजबुज सुरू…!!

बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

पुणे जिल्हा पोलीस दलातील एका प्रामाणिक व कर्तव्यदक्ष वरिष्ठ अधिकाऱ्याला जाणीवपूर्वक गुंतवण्यात आले असल्याच्या चर्चेला उधाण आले असून,एका सावकाराने त्याच्यावर होणारी कारवाई टाळण्यासाठी व त्या प्रामाणिक अधिकाऱ्याला बदनाम करण्यासाठी व ब्लॅकमेलिंग करण्याच्या हेतूने एका मुलीला पूढे घालत हा प्रकार केला असल्याच्या चर्चेला पेव फुटले,असून आता जाणीवपूर्वक बदनाम केलेल्या अधिकार्‍यामुळे पोलीस दलाची ही मोठ्या प्रमाणावर बदनामी झाली असून वरिष्ठ पोलीस अधिकारी या सावकारांवर काय कारवाई करणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

त्या वरिष्ठ अधिकाऱ्याने चार्जे घेतल्यापासून अगदी प्रामाणिक पणे काम केले होते,अवैधरित्या चालणाऱ्या सावकारांवर गुन्हा दाखल करत,सावकारकी करणाऱ्यांचे कंबरडे मोडले होते,आणि गोरगरिबांना सावकारी पाशातून मुक्त करण्याचे काम ह्या धडाकेबाज अधिकाऱ्यानेच केलं.यामुळे अनेक गोरगरिबांना ह्या अधिकाऱ्याचा मोठा आधार मिळत होता,आता मात्र गोरगरिबांच्या कैवाऱ्याला जाणीवपूर्वक बदनाम करण्यात आले आहे,अशी चर्चा देखील सुरू आहे,यामुळे आता वरिष्ठांनी या प्रकरणात लक्ष घालून एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला ह्या बदनामीच्या कलंकातून मुक्त करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

तसेच या प्रामाणिक गोरगरिबांच्या कैवाऱ्याला ज्या सावकाराने जाणीवपूर्वक बदनाम करण्याच्या हेतुने हा घाट घातला असावा,
यामुळे आता या सावकारावर पोलीस प्रशासन मोक्का अंतर्गत कारवाई करणार का ? त्याच्या अशा घातक कृत्यामुळे जी पोलीस अधिकाऱ्याची होणारी बदनामी व पोलीस दलावर संशयाची सुई निर्माण करणाऱ्या घातकी सावकारांवर आता वरिष्ठांनी मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.जर कारवाई नाही झाली तर अशा मोकाट सुटलेल्या सावकारांची मजल आणखी वाढेल अशी चर्चा देखील दबक्या आवाजात सुरू आहे..लवकरच या सावकाराची महाराष्ट्र टुडे लाईव्ह पोलखोल करणार असून,या सावकाराला उघडा पाडत प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांसाठी महाराष्ट्र टुडे लाईव्ह जोरदार प्रयत्न करणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *