करमाळा : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील आश्रमाचे प्रमुख तथाकथित,स्वयंघोषित मनोहर (मामा) भोसले यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहेत.मनोहर भोसले यांच्या विरोधात अनेक तक्रारी दाखल झाल्या असून, मनोहर ( मामा) भोसले व त्यांच्या साथीदारांवर करमाळा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन करमाळा पोलिसांनी मनोहर भोसलेंना ताब्यात घेतले होते,दरम्यान या प्रकरणी भादवि कलम ३७६ (२),n,३७६ (ड),३५४,३८५ आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायदा कलम ३ नुसार गुन्हा दाखल होता.
बारामती तालुका पोलिसांच्या फसवणूकीच्या गुन्ह्या प्रकरणी कस्टडी संपल्यानंतर,करमाळा पोलिसांनी मनोहर भोसले यांना ताब्यात घेतले होते,भोसलेला न्यायालयात हजर केले असता त्याला तेरा दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती,मात्र बारामतीत दाखल असलेल्या गुन्ह्या संदर्भात भोसलेंना इतर
कारणांचा दाखला देत जामीन मागितला होता.तर काही शर्तीच्या अधीन राहून मनोहर भोसले यांना त्याठिकाणी जामीन मंजूर करण्यात आला असून,त्यामध्ये भोसले हे आपल्या दोन्ही मठाकडे जाऊ शकत नाहीत किंवा जे तक्रारदार किंवा साक्षीदार आहेत त्यांच्यावर दबाव टाकू शकत नाहीत.यासह ५ अटींसह भोसले यांना जामीन मंजूर आला आहे.
मात्र करमाळा पोलीस ठाण्यातील दाखल असलेल्या गुन्ह्यातील पोलिस कस्टडी संपल्यानंतर मनोहर भोसले यांनी बार्शीच्या जिल्हा सत्र न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता या संदर्भात मेहरबान कोर्टाने तब्बल चार वेळा हेरिंग घेत आणि संबंधित व्यक्ती पीडित महिलेने स्वतः कोर्टात उभा राहत तक्रार दाखल केली होती की,मनोहर भोसले याला जामीन झाला की तो तपासावर दबाव आणेल कारण,त्याचे मोठं मोठ्या राजकारण्यांसोबत संबंध असल्यामुळे त्याला जामीन होऊ नये.फिर्यादीचा युक्तिवाद ग्राह्य धरत बार्शीच्या जिल्हा सत्र न्यायालयाने मनोहर भोसलेचा जामीन फेटाळण्यात आला असून, मनोहर भोसले यांची दिवाळी आता जेलमध्ये होणार अशी चिन्ह दिसू लागले आहे…