शिरूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
शिरूर तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या पिंपरखेड शाखेवर पडलेल्या सशस्त्र दरोड्याची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून, याप्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली असून,त्यांच्याकडून २ कोटी ३६ लाख ४२ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.डॉलर ऊर्फ प्रविण सिताराम ओव्हाळ,(रा.वाळद,ता.खेड), अंकुर महादेव पाबळे (कावळपिंपरी,ता.जुन्नर) धोंडीबा महादु जाधव, (रा.निघोज कुंड, ता.पारनेर,जि.अहमदनगर),आदिनाथ मच्छिंद्र पठारे ( रा. पठारवाडी, ता.पारनेर,जि.अहमदनगर), विकास सुरेश गुंजाळ,(रा. टाकळी हाजी,ता.शिरूर ) अशी अटक आरोपीची नावे आहेत.
पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार,शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरखेड (ता. शिरुर)येथील बैंक ऑफ महाराष्ट्र शाखेवर आठ दिवसापूर्वी ५ अज्ञातांनी दराडो टाकून कर्मचारी आणि ग्राहकांना हातातील पिस्तुलचा धाक दाखवून बँकेतील रोकड,सोन्याचांदीचे दागिने असा २ कोटी ७९ लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके व सुरेशकुमार राऊत यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा शिरुर व दौंड उपविभागाची अशी ५ तपास पथके तयार केली होती.ही पथक गस्त घालताना खबऱ्याकडून माहिती मिळाली की,सदरचा दरोडा डॉलर ऊर्फ प्रविण ओव्हाळने त्याच्या साथीदारासमवेत केला असून आरोपी हे साथीदारासमवेत केला असून आरोपी हे मध्यप्रदेशात पळाले आहेत.त्यामुळे एक पथक आरोपींच्या शोधाकरिता मध्यप्रदेशात गेले होते.
त्यांच्यातील एक साथीदार हा अहमदनगर जिल्ह्यातील निघोज (ता. पारनेर ) येथे येणार असल्याची माहिती गुप्त खबऱ्यामार्फत मिळाली.त्यानुसार सदर ठिकाणी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.सदर आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याने गुन्हा हा चार साथीदारांसमवेत केल्याची कबुली दिली.आरोपीकडून पोलिसांनी २ कोटी ३६ लाख ४२ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.तसेच आरोपीने स्वतःची ओळख लपवून राहावी यासाठी गोरा करण्या पूर्वी वापरलेले कपडे जाळून टाकलेली असून विविध क्लृप्त्या वापरून गुन्हा केलेला असतानाही पुणे ग्रामीण पोलिसांनी गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणून मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलीस यंत्रणेला यश मिळालेले आहे.
ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग मिलिंद मोहिते,दौंड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके, सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर,सहा.पोलीस निरीक्षक संदीप येळे,सचिन काळे,नेताजी गंधारे सहा.पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे,पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे,रामेश्वर धोंडगे,सहायक पोलीस उपनिरीक्षक तुषार पंधारे शब्बीर पठाण,पोलीस हवालदार जनार्दन शेळके,राजु मोमीन, दिपक साबळे,विक्रम तापकीर,सचिन घाडगे,विजय कांचन, अजय घुले,अनिल काळे, रविराज कोकरे,पो.ना.योगेश नागरगोजे,गुरू जाधव,अभिजीत एकशिंगे,स्वप्निल अहिवळे विजय माळी, प्रकाश वाघमारे,काशीनाथ राजापुरे,मुकुंद कदम प्रमोद नवले,प्रसन्न घाडगे,अक्षय नवले,निलेश सुपेकर, संदिप वारे,धिरज जाधव,मंगेश भगत,शब्बीर पठाण,पोलीस हवालदार जनार्दन शेळके,राजु मोमीन, दिपक साबळे,विक्रम तापकीर, सचिन घाडगे,विजय कांचन,अजय घुले,अनिल काळे,रविराज कोकरे, पो.ना.योगेश नागरगोजे, गुरू जाधव अभिजीत एकशिंगे,स्वप्निल अहिवळे,सहा.फौज,विजय माळी,प्रकाश वाघमारे, काशीनाथ राजापुरे, मुकुंद कदम,प्रमोद नवले, प्रसन्न घाडगे,अक्षय नवले, निलेश सुपेकर, संदिप वारे,धिरज जाधव मंगेश भगत,अमोल शेडगे, प्राण येवले, बाळासाहेब खडके, पुनम गुंड, समाधान नाईकनवरे, दगडु विरकर यांनी केली आहे.