उंडवडी सुपे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
उंडवडी कप (ता.बारामती) शुक्रवार दि.२९ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेचार च्या सुमारास मॅगडोल नंबर 1ने भरलेला दारुचे ट्रक पलटी झाला यात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी ड्रायव्हर व किनर बालबाल बचावले आहेत.
गाडी नंबर एम एच १२ एफ सी ६१५० पिंपळी (बारामती) येथील कंपनी मॅगडोल नं १ दारुने भरलेला ट्रक घेऊन जळगांव येथे निघाला आसता पहाटे साडेचार च्या सुमारास झोपेच्या नशेत गाडी उंडवडी कप येथील पवार डाब्या समोर चारीत पलटी झाली यात जवळपास दारुचे ९५० बॉक्स भरलेले होते याची किंमत जवळपास ६५ लाख रु असल्याची माहिती गाडी ड्रायव्हर निलेश गोसावी व किनर अंकुश बेंद्रे (राहणार बारामती) यांनी दिली.
दारुचा ट्रक पलटी झाल्याची बातमी वा-यासारखी आजुबाजुच्या परिसरात पसरल्याने येथील नागरिकांनी पिशव्याची पिशव्या भरुन दारुच्या बाटल्या भरुन पळुन नेल्या यात महिलांसह मुलींनीही दारु पळुन नेल्या परंतु ड्रायव्हर व किनर यांना कोनीही गाडीतुन बाहेर काढण्यासाठी मदत केली नसल्यामुळे दारु पुडे माणुसकी कमजोर पडल्याचे चित्र पहायला मिळाले. सकाळ पर्यंत लोकांनी दारु लुटण्यावर बर दिलता परंतु बारामती ग्रामीणचे पोलीस घटणास्थळी दाखल होताच लोकांनी दारुच्या बाटल्या सोडुन पळ काढला.
बातमी चौकट :
गाडी ड्रायव्हर निलेश गोसावी व किनर अंकुश बेंद्रे यांनी लोकांना दारु नेऊ नये यासाठी प्रयत्न केला आसता ड्रायव्हर याला मारहाण केली तर गाडीची ताडपत्री सतुर या हत्याराने फाडुन पोतीच्या पोती दारु भरुन नेली विशेष म्हणजे यात महिला ही सामील आसल्याची माहिती गाडी चालक यांनी दिली.
फोटो ओळ – उंडवडी कप येथे मॅगडोल नंबर १ ने भरलेला दारुचा ट्रक पलटी झाल्याचे छायाचित्रे