बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
पुणे जिल्ह्यातील पोलिस दलातील संताचे नाव मिरवणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शेजारील तालुक्याच्या ठिकाणी एका तरुणीसोबत संमतीने केलेली रासलिला त्याच्या आणि पोलिस दलाच्या अंगलट आली आहे.हा हनीट्रॅपचा प्रकार असल्याने गुन्हा दाखल केल्यास पोलिस दलाची बदनामी होईल अशी भीती आहे.तसेच संबंधित तरुणीनेही बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आहे अशा चर्चेला देखील उधाण आले असल्याने,या संताची परिस्थिती “इकडे आड तिकडे विहिर”अशी झाली आहे.
जिल्हा पोलिस अधिक्षकांनीही या प्रकरणी दोन दिवसांत निकाल लावू अशी ग्वाही दिली आहे.हा अधिकारी आणि एक/महाविद्यालयीन तरुणी यांनी एका लॉजवर केलेल्या या रासलीलेची चर्चा बारामती, दौंड व पुरंदर तालुक्यात गेल्या आठ दहा दिवसांपासून मोठ्या प्रमाणात सुरू आहे.त्यामुळे पोलिस दलाची बदनामी सुरू झाली आहे.मात्र,हा हनीट्रॅपचा प्रकार असल्याची शंका पोलिसांना आहे.यात गुन्हा दाखल होऊ शकतो पण पोलिस दलाच्या अधिकृत बदनामी भीती पोलिसांना आहे. हा व्हिडिओ व व्हाट्सअप चॅट जिल्ह्यातील एका मोठ्या शहरातील खासगी सावकाराने व्हायरल केल्याची चर्चा देखील जोरदार सुरू आहे.
त्यामुळे हा प्रकार हनीट्रॅप आहे की ब्लॅकमेलिंगचा प्रकार याबाबतची चर्चा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह नागरिकांतही सुरू आहे.पोलिस दलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संताचे नाव मिरवणाऱ्या हा अधिकारी व एक महाविद्यालयीन तरुणी जिल्ह्यालगतच्या एका तालुक्यातील लॉजवर गेले होते.तेथे याअधिका-याने स्वतः दारू पित त्या मुलीलाही दारू पाजली.त्यानंतर दोघांनी केलेली रासलीला कॅमेर्या-त कैद झाली. या व्हिडिओमध्ये संबंधित तरुणी व अधिकारी विवस्त्र असून,यात तरुणी अधिकार्याला अनेक अश्लिल प्रश्न विचारत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.ही तरुणी त्या अधिका-यासोबत स्वतःहून लॉजवर गेली असल्याचे दिसून येत असले तरी यामागे एका खासगी सावकाराने रचलेला हनीट्रॅप असल्याची चर्चा पोलिस दलात आहे.हनीट्रॅप रचणारा खाजगी सावकार हा संबंधित मुलीचा कथित मित्र असून ते दोघे,रासलीला करणारा अधिकारी काम करत असलेल्या पोलिस ठाण्याच्या आवारात अनेकदा दिसून आले आहेत. त्यामुळे यामागे मोठे षड्यंत्र असल्याची चर्चा पोलिस दलामध्ये आहे.
हा व्हिडीओ काही वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोचला आहे. मात्र,या अधिकाऱ्यावर कारवाई केल्यास पोलिस दलाची बदनामी होईल,या हेतूने हे प्रकरण दडपण्यात येत आहे.तर खासगी सावकारावर कारवाई केल्यास त्याची कथित मैत्रीण अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असल्याने संबंधित अधिकारी अडचणीत सापडला आहे. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख म्हणाले,”या रासलीलेची तोंडी चर्चा माझ्यापर्यंत आली आहे.मात्र याबाबतची लेखी तक्रार अथवा एखादा पुरावा हाती न आल्याने अधिकाऱ्यावर थेट कारवाई करणे जड जात आहे.मात्र या प्रकाराची वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरू करण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्याची खातेनिहाय चौकशी करण्यात आली आहे.त्यामुळे पुढील दोन दिवसांत या प्रकरणात दोषी असणाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.”