भिगवणमध्ये आनंद लॉजवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश,एकावर गुन्हा दाखल..!!


भिगवण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

हॉटेल लॉजमधील सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करून भिगवण पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली.तर महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या एकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गंगाजी नारायणराव आवरगंड वय.३२,वर्ष,रा.भिगवणता.इंदापूर,जि.पुणे,मूळ रा.रुमणा,ता. गंगाखेड,जि.परभणी ) अस गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचं नाव आहे.बारामती-भिगवण रोडनजीक असणाऱ्या आनंद लॉजवर अवैध वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याची माहिती भिगवण पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार पोलिसांनी पथकाच्या मदतीने संबंधित लॉजवर छापा टाकून दोन महिलांची सुटका केली.

महिलांना वेश्या व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या एका जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास तालुका पोलिस निरीक्षक महेश ढवाण हे करीत आहेत.काही दिवसांपूर्वी याच लॉजसमोर एका व्यक्तीला काठीने मारहाण झाल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता.नक्की या प्रकरणाचे पुढे काय झाले ? या चर्चेला देखील उधाण आले आहे.या लॉजवर वेश्या व्यवसायासाठी नक्की कुणाचा वरदहस्त आहे ? हे पाहणं महत्वाचं आहे.यामुळे नक्की या लॉजचे मूळ मालक कोण ? आणि या अवैध वेश्या व्यवसायाला चालना देणारी व्यक्ती भिगवण परिसरातील एक बडा सावकार आहे अशी चर्चा देखील भिगवण परिसरात रंगली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *