सातारा : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
ज्यांनी सहकार खाजगीकरणाच्या नावाखाली मोडीत काढला ते पुन्हा सहकाराची भाषा करता. जरंडेश्वर साखर कारखान्याला कर्ज दिल्यानेच जिल्हा बँकेच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला त्यामुळे जरंडेश्वरच्या गुरुलाच जाब विचारायला हवा त्यासाठी हा गुरू कोण ? हे समोर यावे असा घणाघात खासदार उदयनराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच नाव न घेता केला.जिल्हा बँकेत अर्ज भरल्यानंतर सोमवारी मौनव्रत धारण केलेल्या उदयनराजे यांनी आज शासकीय विश्रामगृहात पुन्हा आक्रमकपणे तोफ डागली. उदयनराजे पुढे म्हणाले सहकारी बँक ही शेतकऱ्यांच्या आणि सभासदांच्या मालकीची आहे.ही बँक व्यक्तिगत कोणाची जहागिरी नाही.दबाव टाकून बँकेत येणायातला मी नाही.लोकांनी त्यांच्या पैश्याची देखरेख करण्यासाठी मला बँकेत पाठवलं आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
मी जागा अडवण्यासाठी बँकेत आलो नाही.जरंडेश्वर कारखान्याला कर्ज देताना शेतकऱ्यांच्या हिताचा विचार का केला नाही ? जरंडेश्वर कारखाना गुरू कमोडिटीच्या ताब्यात आहे,मात्र याचा गुरू कामोडीटीचा गुरू कोण ? असा सवाल उपस्थित केला आहे.कारखाना कुणाच्या मालकीचा आहे,असा सवाल उपस्थित करत उदयनराजे यांनी पवार कुटुंबावर पुन्हा एकदा निशाण साधला आहे.ज्यांनी सहकारी संस्था मोडीत काढल्या ते पुन्हा सहकारात कसे काय ? ज्यांनी ज्यांनी सहकारी संस्था मोडकळीत काढल्या त्यांनी १० तारखेच्या आत फॉर्म माघारी घ्यावेत.माझी पण माघार असेल,असे सांगत आमदार शिवेंद्रराजे यांच्या मोडकळीत आलेल्या अजिंक्यतारा महिला सहकारी बँकेवर निशाण साधत शिवेंद्रराजेंवर नाव न घेता टोला लगावला.