शेटफळगडे येथे अवैध धंदे जोमात….सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार कारवाई करणार का ??


शेटफळगडे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

शेटफळगडे ता इंदापूर हे गाव तालुक्यातील महत्वाचे गाव मानले जाते भिगवण बारामती हायवे लगत असणारे हे गाव भिगवण पोलीस स्टेशन च्या अगदी काही अंतरावर येते या गावात भांडण तंटा वाद विवाद तसेच गावाच्या नावाला गालबोट लागू नये यासाठी येथील ग्रामपंचायत व भिगवण पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी कायम या गोष्टींची खबरदारी घेत असतात,परंतु असे असताना देखील आता या गावात अवैध दारूचे जुगाराचे धंदे जोमात चालू झाल्याचे चित्र आपणाला पाहावयास मिळत आहे.बारामती भिगवण हायवे लगत शेटफळगडे येथील चौकात आणि कारखाना परिसरात दारू व्यवसायकांनी उच्छाद मांडला आहे.शेटफळगडे लगतच मोठा साखर कारखाना असल्यामुळे कारखाना चालू झाला की तेवढ्याच मोठया प्रमाणावर अवैध धंद्यांचा उत येतो हे असेच चित्र येत्या काळात चालू राहिले तर गावाची शांतता भंग होऊ शकते.

दारूमुळे जुगारीमुळे गावातील कित्येकांच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे.तरुण पिढी गावात सहज उपलब्द होणाऱ्या दारूमुळे वाया जात आहे व भरकटत चालली आहे.हे असेच चालू राहिले तर गावात तळीरामांची संख्या वाढून गावात वादविवाद भांडणे व गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ होऊन गावाची प्रतिष्ठा लयाला जाऊ शकते वेळीच याआधीच अवैध धंद्यांना लगाम लावला पाहिजे, कारखानदारी मूळे मोठया प्रमाणावर मजूर बाहेर गावावरून येथे वास्तव्याला येतात,ते आले की मोठया प्रमाणावर येथे अवैध धंदे वाढू लागतात हे दृश्य आत पहावयास येत आहे.आता यावर भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार कसा पायबंद घालून कार्यवाही करतात हे पाहणं आता गावकऱ्यांसाठी औतुसक्याचं ठरणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *