उरुळी कांचन : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
राहू येथील वाळू व्यावसायिक संतोष जगताप खून प्रकरणातील दोघा आरोपीना न्यायालयाने ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिली.आरोपी पवन गोरख मिसाळ,(वय.२९,रा.दत्तवाडी, उरळी कांचन),महादेव बाळासो आदलिंगे (वय.२६, रा.जूनी तांबे वस्ती,दत्तवाडी, उरळीकांचन,ता. हवेली) असे पोलीस कोठडी सूनावलेल्या
आरोपीची नावे आहेत.पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार,संतोष जगताप (वय.३८,रा.राहू,ता.दौंड) याचा ऊरळी कांचन येथे शुक्रवारी (दि. २२) दिवसाढवळ्या गोळी झाडून खून झाला होता.
त्यानंतर या प्रकरणातील दोघा आरोपींना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट -६ च्या पथकाने अवघ्या २४ तासांच्या आत बेड्या ठोकून लोणी काळभोर पोलीसांच्या ताब्यात दिले होते.या आरोपीना न्यायालयात हजर केले होते. यावेळी आरोपीचे वकील व सरकारी वकील यांचा युक्तीवाद झाला.तसेच लोणी काळभोर पोलिसांची बाजू ऐकून घेत न्यायालायाने आरोपींना ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.लोणी काळभोर पोलीस तपास करत आहेत.