पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
दुहेरी हत्याकांडातील आरोपी दौंड तालुक्यातील राहू येथील वाळू व्यावसायिक संतोष जगताप वय.३८ रा.राहू,ता.दौंड,जि.पुणे) याचा दिवसाढवळ्या गोळ्या घालून खून करणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांनी अवघ्या २४ तासाच्या आत इंदापूरातून गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.याबाबत शहर पोलीसांनी दजोरा दिला असून,पवन मिसाळ,नन्या आदलिंग असे ताब्यात घेतलेल्यांची नावे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.पोलीस सूत्रांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार लोणी
काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी (दि.22)
दुपारी हॉटेल सोनाई समोर संतोष जगताप वर गोळीबार
झाला होता.
यात संतोष आणि त्याचा अंगरक्षक गंभीर जखमी झाले.
उपचारादरम्यान, संतोष जगतापचा मृत्यू झाला.संतोष जगतापने देखील स्व:रक्षणासाठी गोळीबार केले होता.यात स्वप्नील खैरचा मृत्यू झाला.संतोष जगतापवर भरदिवसा गोळीबार करणाऱ्याचा शोध पुणे पोलिस घेत होते.दरम्यान,आरोपींबाबत गुन्हे शाखेच्या पोलिसांना माहिती मिळाली होती.त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी इंदापूर जवळून दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून अग्नीशस्त्रे आणि वाहन जप्त केल्याची माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.इतर फरार आरोपींचा पुणे पोलिस शोध घेत आहेत.