महावितरण कंपनीच्या व शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रॉनिक मोटार चोरी करणाऱ्या टोळीला ताब्यात घेत ३ लाख ४० हजारांचा मुद्देमाल केला हस्तगत…!!


नूतन पोलीस निरीक्षक धन्यकुमार घोडसेंच्या धडाकेबाज कामगिरीमुळे शेतकरी झाले धन्य….!!

फलटण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचे इलेक्ट्रीक ट्रान्सफॉर्मर चोरी करणाऱ्या आरोपी अक्षय विजय भोसले वय.२४,वर्ष (रा.साठेफाटा,ता.फलटण,जि. सातारा) अशोक बापुराव चव्हाण २७ वर्ष (रा.खटकेवस्ती,ता. फलटण,जि.सातारा) व इतर दोन यांच्या टोळीला ताब्यात घेतले असून,आरोपींविरोधात फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या ताब्यातील तब्बल साडे तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

फलटण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,इलेक्ट्रीक ट्रान्सफॉर्मर चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी फलटण ग्रामीण पोलिसांनी गुन्हे शाखेने एक पथक तयार करण्यात आले होते.हे पथक इलेक्ट्रीक ट्रान्सफॉर्मर चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेत,असताना त्यांना आरोपी अक्षय विजय भोसले,अशोक बापुराव चव्हाण व इतर दोन साथीदारांचा सहभाग असल्याची माहिती मिळाली.या माहितीवरुन आरोपी अक्षय भोसले व अशोक चव्हाण यांना ताब्यात घेण्यात आले असून, गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना त्यांनी इतर साथीदारांसह फलटणमध्ये १६ इलेक्ट्रीक ट्रान्सफॉर्मर,शेतीसाठी विहीरीवर बसविलेल्या मोटार चोरीच्या ३ गुन्ह्यांची कबुली दिली आहे

त्यांनी चोरलेला मुद्देमाल हा विलास कृष्णा भगवे,वय.४१ वर्ष,(रा. विझोरी,ता.माळशिरस,जि.सोलापूर) याला विकल्याचे सांगितले असता त्याला ताब्यात घेत त्याच्या ताब्यातील २,९०,००० किंमतीची कॉपर वायर व आरोपींनी वापरलेली ५०,००० किंमतीची मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे. ही मोटरसायकल आरोपींनी गुन्हे करण्यासाठी लोणंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले असून या गुन्ह्याचा तपास अद्याप सुरू असून इतर दोन साथीदारांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल,अप्पर पोलीस अधीक्षक अजित बो-हाडे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे,पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे,पोलीस हवालदार दत्तात्रय कदम,रामदास लिमण, अमोल कर्णे,मोहन हांगे,अशोक टिळेकर,उर्मिला पेंदाम,पोलीस नाईक सहदेव तुपे,अभिजित काशिद,वैभव सूर्यवंशी,हरिदास धराडे,महेश जगदाळे,विक्रम कुंभार,सचिन पाटोळे,गणेश अवघडे यांनी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *