उस्मानाबादमध्ये झालेला भगव्याचा अपमान काकांच्या मांडीवर बसल्याने कदाचित तुम्हाला दिसत नसेल,गोपीचंद पडळकरांचा राऊतांना टोला..!!


सांगली : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

सध्या महाराष्ट्रातील राजकारणाने एक वेगळे वळण घेतले असून महाविकास आघाडीतील मंत्री सरकारी अधिकाऱ्यांवर व महापुरुषांवर वेगवेगळी विधाने करत असून, या सगळ्या गोष्टींना प्रत्युत्तर देताना गोपीचंद पडळकरांनी आक्रमक होत शिवसेनेचे खासदार संजय राऊतांवर निशाणा साधत,जनाब संजय राऊत महाराष्ट्रात औरंगजेबाची स्तुती करणारी गोष्ट लिहली जाते.व त्यावरून उस्मानाबाद मध्ये दंगे होतात. महाराष्ट्रातील कमकुवतपणा व लाचारी लपवण्यासाठी तुम्ही भाजपाला हिंदुत्व शिकवणारे मोठ मोठे लेख लिहता.संजय राऊत तुम्हाला कदाचित काकांच्या मांडीवरून उस्मानाबाद मध्ये झालेला भगव्याचा अपमान व औरंगजेबाच्या औलादीचा तांडव दिसत नसावा.

ऐन हिंदू सणाच्या दिवशी महाराष्ट्राची आणि हिंदुत्वाची शान असणाऱ्या भगवा ध्वज लावल्यावरून जर उस्मानाबाद मध्ये पोलिसांच्या वरती दगड फेक होते.यावेळी एरवी उस्मानाबादचा धाराशिव करतो म्हणणाराच्या हाताला लखवा मारतो काय ? तुमच्या आघाडी सरकारमधील मंत्री स्वातंत्रवीर सावरकरांच्या बद्दल उलट सुलट बोलतात उलट सुलट लिहतात. यावेळेस सत्ता टिकवण्यासाठी तुमच्या वाघाचा ससा होतो का ? तुमच्या औरंगाबादमध्ये गरोदर माहिलेवरती अत्याचार होतो,त्याबाबतीत तुम्हाला एखादी ओळ खरडावी वाटत नाही का ? औरंगाबादचा संभाजीनगर करतो म्हणणाऱ्यांनी निजामशाहीची पालखी उचलण्यामध्ये, वाहण्यातचं जास्त त्यांना आनंद मिळत आहे.अशी जळजळीत टीका पडळकरांनी राज्य सरकारवर केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *