जुन्नर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
जुन्नर उपविभागामधील ओतुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही इसम अवैध दारू विक्री करत असल्याने त्यांच्यावर वारंवार कायदेशीर कारवाई करण्यात आलेल्या आहेत.कायदेशीर कारवाया केल्यानंतर सुध्दा काहींनी कायदयास न जुमानता त्यांचे अवैध धंदे चालुच ठेवत असून,अवैध व्यवसायांना वेळीच
आळा घालुन त्यांचेवर प्रचलीत कायदयान्वये कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर आरोपी बाळु बबन नायकोडी,वय-३९ वर्षे,(रा. डिंगोरे,ता.जुन्नर,जि.पुणे ) मुळ रा.सांगणोरे,ता.जुन्नर,जि.पुणे याच्यावर वारंवार अवैध दारू विक्री करणे,गर्दी जमाव जमवुन मारहाण करणे अती प्रमाणात दारू पाजल्यामुळे मृत्यु होवु शकतो हे माहिती असताना सुध्दा एखादयास जाणीवपुर्वक दारू पाजुन त्याच्या मृत्युस कारणीभुत ठरणे,असे ६ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
आरोपी याच्याविरूध्द ओतुर पोलीस ठाणे येथुन एम.पी.डी.ए.कायदयांतर्गत प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षक पुणे ग्रामिण यांनी जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे सादर करण्यात आला होता जिल्हा दंडाधिकारी पुणे यांनी या प्रस्तावामधील आरोपी बाळु बबन नायकोडी यास कायदयांतर्गत १ वर्षे स्थानबध्द करण्याचे आदेश पारीत केले आहेत.त्यानंतर बाळु बबन नायकोडी यास ओतुर पोलीस अधिकारी केरूरकर व इतर पोलीस कर्मचारी यांनी ताब्यात घेवुन सर्व कायदेशीर
बाबींची पुर्तता करण्यात आली आहे.ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे,उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.एच.कांबळे ओतुर पोलीस ठाण्याचे पोसई केरूरकर,शेळके,पोलीस हवालदार पठारे, जगताप,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक गोराणे , सुर्यवंशी,खेडकर,पवार यांनी पथकाने केली आहे.