मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या रूपाली चाकणकर यांचे वर्णी लागल्यानंतर,त्यांनी महिला आयोगाचे कामकाज सुरू केल्यानंतर यामध्ये राज्य महिला आयोगात येणाऱ्या तक्रारींचा आढावा घेताना एक बाब प्रकर्षाने समोर आली,ती म्हणजे महिलांच्या ज्या तक्रारी आहेत त्या पोलिस विभागाशी संबधित आहेत.त्यामुळे पोलिस विभागाने त्यांच्याकडे येणाऱ्या तक्रारी या विहित कालावधीत पूर्ण करून संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी. यामुळे आपल्याकडे येणारे महिलांना खऱ्या अर्थाने सुरक्षिततेची भावना निर्माण करून देण्यासाठी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करून देणे गरजेचे आहे.असे देखील चाकणकरांनी आवर्जून सांगितले.
ज्या तक्रारी येतात त्या तक्रारींचा निपटारा योग्य वेळेत होणे गरजेचे आहे.कारण “उशीरा दिलेला न्याय म्हणजे अन्याय सारखाच असतो” यामुळे इथून पुढच्या कालावधीत आम्ही महिलांना योग्य वेळेत न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत.तसेच महिला वरती वाढते अत्याचार आणि अन्याय लक्षात घेता मुंबईचे पोलीस आयुक्त यांनी परिपत्रकाद्वारे प्रत्येक पोलिस ठाण्याला निर्भया पथक कार्यरत करण्यासाठी असे आदेश दिलेले यानुसार हे पथक कार्यरत राहण्यासाठी या पथकाची अंमलबजावणी देखील होणे गरजेचे आहे.यामुळे राज्य महिला आयोगाच्या वतीने येत्या आठ दिवसांत प्रत्येक पोलीस ठाण्यांना अचानक भेटी देऊन तेथे निर्भया पथक कार्यरत आहे की नाही ? याची पाहणी केली जाईल,त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्यांनी आपल्या ठाण्यात निर्भया पथक कार्यरत ठेवावे असे आवाहन देखील राज्य महिला आयोगाच्या नवनियुक्त अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले.