मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
सध्या महाराष्ट्रात राज्य सरकारच्या काही मंत्र्यांकडून अत्यंत
घाणेरड्या पद्धतीने राजकारण सुरू असल्याच्या चर्चेला उधाण आले असून,केवळ स्वतःच्या जावयावर कारवाई केली म्हणून, एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर जाणीव पूर्वक आरोप केले जात असल्याच्या चर्चेला देखील उधाण आले आहे.यामध्ये राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी चे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर मॉलदिव मध्ये जाऊन बॉलीवूडच्या अभिनेत्याने कडून खंडणी वसूल केल्याचा आरोप केला असून,आरोपांवर मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी पत्रकार परिषद घेत सडेतोड उत्तर दिलं.
आमच्या कार्यालयीन कामकाजांवरुन वैयक्तिक पातळीवर खालच्या पातळीत आणि घाणेरडे आरोप केले जात असल्याचं
वानखेडे यांनी म्हटलं. राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांनी आपल्या
मृत आईवर,निवृत्त वडिलांवर आणि बहिणीवर चुकीचे आणि गंभीर आरोप केले. त्यांचं मी खंडन करतो.तसेच त्यांनी बहिणीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर जाऊन जासूसी केली,असं देखील समीर वानखेडे आक्रमकपणे म्हणाले.मालिकांनी केलेले आरोप अतिशय घाणेरडे आणि खोटे असून लवकरच वरिष्ठांची परवानगी घेऊन मालिकांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे देखील समीर वानखेडे यांनी सांगितले.