बारामती :महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
केंद्रातील सरकारने देशातील जनतेला खोटी आश्वासने देऊन मोकळ्या भूलथापा मारून गेली सात वर्षापासून संपूर्ण भारत देशाच्या अर्थव्यवस्थेचे पूर्णपणे वाट लावलेले आहे. देशांमध्ये पेट्रोल-डिझेल तसेच घरगुती गॅसच्या किंमती वाढवून केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेचे जीवन आर्थिक दृष्ट्या हतबल केले आहे.वाढत्या महागाईमुळे कधी नव्हती एवढी प्रचंड प्रमाणात महागाई प्रत्येक गोष्टींमध्ये वाढलेली आहे.कोरोना काळात अनेक व्यवसाय बुडाले आहेत.बेरोजगारी वाढली आहे आणि त्यातच केंद्र सरकारची सततची दरवाढ अशा परिस्थितीत सामान्य जनतेचे जगणे मुश्कील झाले असून जनता महागाईने त्रस्त झालेली आहे.तसेच वेगवेगळ्या प्रकारचे कर वाढवून प्रचंड दरवाढ करून गोरगरीब जनतेच्या तोंडातील घास हिरावून महापाप या केंद्र सरकारने केले आहे.
सामान्य गोरगरीब जनतेशी असंवेदनशील पणे वागणाऱ्या केंद्र सरकारचा बारामती तालुका व शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल व घरगुती गॅस दरवाढ कमी करावी अशा मागणीचे निवेदन केंद्र सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी बारामतीचे तहसीलदार विजय पाटील यांना निवेदन देण्यात आले.या आंदोलनासाठी बारामती तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल वाबळे,बारामती शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
आंदोलनानंतर गांधीगिरी मार्गाने पेट्रोल पंपावरील पेट्रोल ग्राहकांना पेट्रोल डिझेल दरवाढीच्या गुलाब फुले भेट देऊन शुभेच्छा दिल्या व केंद्र सरकारचा निषेध केला.यावेळी आंदोलनास बारामती शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष विशाल जाधव,राष्ट्रवादीचे युवा नेते शुभम ठोंबरे,बारामती तालुका सोशल मीडिया अध्यक्ष सुनिल बनसोडे, बारामती शहर सोशल मीडिया अध्यक्ष तुषार लोखंडे,पुणे जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे उपाध्यक्ष साधु बल्लाळ,अविनाश भिसे,नितीन काकडे,पैगंबर शेख आदिंसह तालुका व शहरातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.