केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील साखर कारखान्याच्या प्रश्नांबाबत दिल्ली येथे बैठक संपन्न..!!


दिल्ली : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील साखर कारखान्यांच्या विविध प्रश्नांबाबत आज एक बैठक नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती.सहकारी साखर कारखानदारीला नवसंजीवनी मिळेल,असे अनेक निर्णय त्यात घेण्यात आले. एफआरपीपेक्षा अधिक पैसे देणार्‍या कारखान्यांच्या प्राप्ती करासंदर्भातील काही प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा निघावी, अशी प्रमुख मागणी होती.१५-२० वर्ष जुन्या या प्रश्नावर सर्वांना दिलासा मिळावा.

यावर सकारात्मक कार्यवाही होईल, असे केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांनी सांगितले.इथेनॉल प्रकल्पाबाबत ऑईल कंपन्या सोबत त्रिपक्षीय करार करून प्रश्न सोडविण्याची भूमिका सुद्धा केंद्र सरकारतर्फे घेण्यात आली,ही बाब महत्त्वाची आहे.कुठे दुष्काळ,कुठे अवकाळी आणि कोविडचा काळ यामुळे अनेक आर्थिक प्रश्न आहेत.त्यामुळे कर्जाच्या पुनर्गठनाबाबत सकारात्मक चर्चा झाली.ज्यावर्षी मोठे उसाचे पीक आले आहे,त्यावर्षी कारखान्यांना कोणतीही अडचण होऊ नये आणि त्यातून कोणतेही नुकसान शेतकर्‍यांचे होऊ नये, यावरही विचार झाला.

राज्य सरकारचा दुजाभाव पाहता सर्वांसाठी पॅकेज तयार झाले पाहिजे, त्यातून सर्वांना समान संधी मिळतील,अशी मागणी करण्यात आली.ही बैठक अतिशय सकारात्मक पद्धतीने पार पडली यावेळी साखर कारखानदारीचा अनुभव असलेले अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे,
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, पृथ्वीराज देशमुख,धनंजय महाडिक, रणजितसिंह मोहिते पाटील,मदन भोसले,राहुल कुल उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *