“घोषणा मुसळाची आणि देणं कुसळांच” अशी परिस्थिती अतिवृष्टीला दिलेल्या पॅकेजची झाली आहे : सदाभाऊ खोत..!!


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

मराठवाडा विदर्भ कोकण पट्ट्यात तसेच पश्‍चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे,यासाठी राज्य सरकारने तब्बल १० हजार कोटींचे पॅकेज या अतिवृष्टी झालेल्या नुकसानीसाठी जाहीर केलेली आहे,याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना सदाभाऊ खोत म्हणाले की,अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पॅकेजची घोषणा म्हणजे “घोषणा मुसंळाची आणि देन कुसळांच” अशी परिस्थिती या पॅकेजची झालेली आहे.या पॅकेज मधून शेतकऱ्यांपर्येंत फक्त दोनशे ते तीनशे कोटी पोहचणार आहेत..मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील महापुर मधला (२०१९ ) जीआर जो जसाचा तसाच लागू करू..

२०१९ च्या जीआर मध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी गुंठ्याला ९५० रुपये मदत मिळाली असून,आता मात्र हेक्टरी बागायती पट्ट्याला १५० रुपये आणि जिरायती भागाला १३० रुपये असे करून राज्य सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे.आम्ही सत्तेत असताना,तुम्हाला शेतकऱ्यांचा फार पुळका यायचा, मात्र आता तुम्ही सत्तेत आहात सत्तेची तिजोरी उघडा आणि शेतकऱ्यांना मदत करा जेणेकरून त्यांच्या होणाऱ्या आत्महत्या वाचतील..अशी खरमरीत टीका रयत क्रांतीचे आमदार सदाभाऊ खोतांनी राज्य सरकारवर केली.दसरा मेळावा झाल्यानंतर एका कार्यकर्त्यांनी ठाकरे यांना फोन केला आणि त्यांनी फोन लगेच उचलला मग सगळीकडे व्हायरल झाले साहेब लगेच अव्हेलेबल झाले.आणि आम्ही मात्र दोन वर्षे झाली २०० पत्र लिहिली,यामध्ये दोन पत्राचे उत्तर देखील अमानी आलं नाही ते पोहचलीत की नाही ? पोहोचतील की नाही ? याच सुद्धा उत्तर अमाणी कधी मिळाला नाही.

कधीही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुम्ही अमानी दोन मिनिट वेळ देऊ शकला नाही ? याचा अर्थ सरळ आहे की “आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय” अशी अवस्था या सरकारची राज्यात चाललेली असल्याचा टोला मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान यासाठी केंद्र सरकार मदत देत नसल्याने आम्ही देखील शेतकऱ्यांना मदत देऊ शकत नाही,यावर बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की फार चांगली गोष्ट आहे,केंद्रामुळे अमानी मदत नाय हे म्हणजे असं झालं की,”शेजारच्यांचा पाळणा हालनाय म्हणून,माझा पण हालनाय” यामध्ये पहिल्यांदा राज्य सरकारने मदत घोषित करायचे असते,त्यानंतर केंद्र सरकारचे एक पथक अतिवृष्टीची पाहणी करून जातात आणि त्यानंतरची मदत राज्यसरकारच्या राज्यकोशात जमा होती,यामुळे “नकटीला नाचायला अंगण वाकडे”अशातला हा प्रकार झालेला आहे.अशी टीका सदाभाऊंनी राज्यसरकार वर केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *