मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
गेल्या चार दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी शुर्खपणा नको ? अस ट्विट केल्यानंतर,राष्ट्रवादीच्या
आमदार विद्या चव्हाण यांनी चित्र वाघ यांच्यावर गंभीर आरोप लावले होते यामध्ये चित्र वाघ ह्या अनेक पुरुषांना ब्लॅकमेलिंग करतात व त्यांच्याकडून खंडणी वसूल करतात तसेच भाजपच्या देखील विद्यमान आमदाराला देखील ब्लॅकमेलिंग करत चित्रा वाघांनी खंडणी देखील मागितली होती असा आरोप विद्या चव्हाणांनी केल्यानंतर या आरोपाला प्रत्युत्तर देताना चित्रा वाघ यांनी विद्या चव्हाण यांनी केलेले आहे हे सिद्ध करून दाखवावे त्याच दिवशी मी राजकारणातून कायमची निवृत्ती घेईल.त्या पीडित मुलीला मी मदत केली त्या मुलीच्या बाबतीतला सर्व प्रकार उपमुख्यमंत्री अजित पवार, तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,शरद पवारांना माहिता होता.
त्याच्यामध्ये आम्ही तिला मदत करत होतो,तिच्यासाठी केस पर्यंत लढायला गेलो होतो हे विद्या चव्हाणांना माहीत नसावे, कदाचित त्यांच्या कौटुंबिक वादामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याची शक्यता नाकारता येत नाही असा टोला चित्रा वाघ यांनी विद्या चव्हाणांना लगावला.उठ सूट उठायचे आणि फालतूचे आरोप करायचे,मलाही खूप बोलता येतं मात्र मला याबाबत बोलायचं नाही तुम्ही माझ्यावर वैयक्तिक टीका करता, माझ्या वैयक्तिक आयुष्यावरती बोलता मी त्या सगळ्या गोष्टी खपवून घेते पण जर तुम्ही माझ्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण केले तर ते चित्रा वाघ कधी खपवून घेणार नाही असा गर्भजळीत ईशारा चित्रा वाघ यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाणांना दिला.
आजही ती मुलगी माझ्या संपर्कात आहे यामुळे कोणत्या मुलीला मी माझ्या घरी ठेवले होते ? आणि कोणत्या आमदाराला मी खंडणी मागितली होती ? हे विद्या चव्हाणांनी सिद्ध करून दाखवावं तसेच चित्रा वाघ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार सुनील तटकरे व शरद पवार यांना आवाहन केले आहे की सदरचा प्रकार या तिघांनी मिळून विद्या चव्हाणांना सांगावा.तसेच कोणत्या आमदाराला मी खंडणी मागितली त्याला समोर घेऊन या नाही त्याचं थोबाड फोडलं तर चित्रा वाघ नाव सांगणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठरविलेल्या स्ट्रेटर्जी नुसार मी काम करत होती,असं असताना जर विद्या चव्हाण असे आरोप करत असतील तर ते खपवून घेणार नाही असे चित्र वाघ यांनी निक्षूण सांगितले.पत्रकारांनी चंद्रकांत पाटलांना विचारलेल्या प्रश्नांमध्ये रूपाली चाकणकर या चित्रा वाघ यांच्या सहकारी होत्या यामुळे त्यांच्या काही गोष्टी त्यांना माहीत असतील असे म्हटले होते, मात्र यावर बोलताना चित्रा वाघ यांनी सांगितले की माझ्या ट्विटमध्ये मी कोणाचं नाव घेतलेलं नाही
तरी मीडिया चाकणकरांकडे कशी जाते हे मला माहीत नाही ?आमचा फक्त एवढंच म्हणणं आहे की महिला आयोगाच्या अध्यक्षपद हे कोणत्या पक्षाचे पद नाही हे एक संविधानीक पद आहे त्या पक्षाला काही गरिमा असतात यामुळे या पदावर बसणारी महिला रावणाला मदत करणारी शुर्खपणा नसावी एवढंच आमचं म्हणणं होतं.कारण रावण सध्या मोकाट फिरत आहेत रुपाली चाकणकर यांच्या नियुक्तीबाबत माझा कोणताही आक्षेप असण्याचे कारण येतच कुठे ? या पदावर कोणी बसल्या तरी त्यांना माझ्या शुभेच्छा असतील तसेच महिलांना शुर्खपणा म्हणणे हा महिलांचा अपमान होतच नाही,कारण शुर्खपणेंन रावणाला चुकीच्या गोष्टीसाठी मदत केली होती,जर तुम्हाला महिलांबद्दल एवढा आदर असेल,तर जिवंत महिलांना जाळला जात,त्यांना कोयत्याने तोडलं जातं.यामध्ये तुम्हाला महिलांवर होणारा अत्याचार आणि त्यांचा अपमान दिसत नाही का ? अशी खोचक टिका चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर केली.