मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
ठाण्यातील रामभाऊ तायडे यांची दलित पँथरच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली.दलित पँथरच्या नेत्या आणि नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका ढसाळ यांनी पत्रकार परिषदेत ही निवड झाल्याचे जाहीर केले.मुंबई मराठी पत्रकार संघात ही पत्रकार परिषद झाली.यावेळी मोठ्या प्रमाणात दलित पँथरचे पदाधिकारी उपस्थित होते.रामभाऊ तायडे हे आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ठाणे शहर जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सांभाळत होते.
त्यांनी नुकताच दोन दिवसांपूर्वी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता.त्यानंतर ते कोणत्या पक्षात जातात याविषयी ठाण्यात चर्चेला उधाण आले होते.२००७ पासून ते या पदावर कार्यरत होते. मात्र त्यापदाचा राजीनामा देऊन त्यांनी सोमवारी नामदेव ढसाळ यांच्या दलित पँथर मध्ये प्रवेश केला. संघटनेच्या नेत्या मल्लिका ढसाळ यांनी त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड केली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नामदेव ढसाळ यांचा दलित पँथर पूर्वी प्रमाणेच जहाल होऊन दलितांना न्याय मिळवून देण्याचे काम करेल असा विश्वास यावेळी तायडे यांनी दिला.