चोरटी वाळू वाहतुक करणाऱ्या रायते वर वालचंदनगर पोलीस ठाण्यात वाळू चोरीचा गुन्हा दाखल…!!!


वालचंदनगर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गोतोंडी येथील पेट्रोलपंप (ता.इंदापूर,जि.पुणे) या ठिकाणाहून पांढऱ्या रंगाच्या हायवामधून बेकायदा बिगरपरवाना चार ब्रास वाळूची चोरट्या पद्धतीने वाळू वाहतूक करणाऱ्या आरोपी रोहित संजय रायते,वय.२१ वर्ष ( रा.सणसर,ता.इंदापूर,जि.पुणे ) याला ताब्यात घेत पोलीस कर्मचारी किसन बेलदार यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार वालचंदनगर पोलीस ठाण्यात भादवी कलम ३७९,पर्यावरण अधिनियम कलम ४,गौण खनिज उत्खनन अधिनियम १९५७ सुधारित कलम ४,२१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गोतोंडी येथील पेट्रोलपंपा जवळून अवैध वाळू वाहतुक करणारा ट्रॅक येत असल्याची माहिती मिळाली असता,वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन तेथे पांढऱ्या रंगाच्या टाटा कंपनीच्या हायवामधून बेकायदेशीरपणे बिगरपरवाना अंदाजे चार ब्रास वाळू चोरून वाहतूक करत असताना मिळाल्याने आरोपीस ताब्यात घेत,आरोपीच्या ताब्यातील दहा लाखांचा हायवा व यातील चोरून आणलेली ४०,००० किंमतीची वाळू असा एकूण १०,४०,००० किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस कर्मचारी खंदारे करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *