गरोदर महिलेला डॉक्टरकडून अमानुष मारहाण,डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल…


यवत : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क

दौंड तालुक्यातील यवत येथील हॉस्पिटलमध्ये प्रसूती कळा येत असल्याने रुग्णालयात भरती झालेल्या एका महिलेस डॉक्टरने अमानुष मारहाण केल्याची गंभीर केल्याची गंभीर घटना घडली आहे.याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार यवत पोलीस
ठाण्यात डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी पुजा गोरख दळवी वय.२६ (रा.खामगांव,दळवीवस्ती,ता.दौंड जि.पुणे) यांना प्रसूती कळा येत असल्याने त्यांना जयवंत हॉस्पीटल (यवत,ता.दौंड जि.पुणे)
या हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

यावेळी तेथील डॉक्टरांनी फिर्यादीस,हयगयीने,अविचाराने फिर्यादीचे तोंडावर,डोक्यावर,हातावर,मांडीवर,ओठांवर चापटाने व बुक्याने अमानुष मारहाण केली.हि मारहाण इतकी अमानुष होती,की मारहाणीमुळे पूजा दळवी यांच्या डोळयाच्या खाली चेह-यावर काळे,निळे रंगाच्या जखमा झाल्या आहेत. या सर्व प्रकारानंतर पूजा दळवी यांनी संबंधित डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तावरे यांच्याकडे देण्यात आला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *