तुम्ही एक पाऊल पुढे या,मी तुमच्यासाठी दहा पाऊल पुढे येईल, भिगवणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांचे प्रतिपादन…!!


शेटफळगडे मध्ये सहा.पोलीस निरीक्षक दिलीप पवारांच्या उपस्थितीत उपाययोजना व प्रतिबंध आढावा बैठक संपन्न..!!

शेटफळगडे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह (उपसंपादक सुरज सवाणे)

गेल्या काही दिवसांपासून लामजेवाडी आणि शेटफळगडे गावात आणि परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून,लामजेवाडी गावात चोरी झाली.तसेच भिगवणलगत असणाऱ्या शेठफळगडे येथे सुध्दा मोटरसायकल चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून,येणारा हा काळ सणासुदीचा आहे,या काळात चोरीचें प्रमाण अधिक वाढते घरफोडी,मोटारसायकलींच्या मालमत्तेची चोरी ही मोठया प्रमाणावर होऊ शकते.कोरोना काळातनंतर मोठया प्रमाणात लोकांचे आर्थिक हाल झाले असून,बेरोजगारी वाढली आहे सर्वसामान्य लोकांची हलाखीची परिस्थिती झाली आहे आणि याच्यातच चोरींच्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे.ही परिस्थिती चिंताजनक आहे याला आळा घालण्यासाठी भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी वाढत्या चोरींचे गांभीर्य लक्षात घेत, शेटफळगडे येथे चोऱ्यांवरती प्रतिबंध कसा घालता येईल यासंदर्भात आढावा बैठक घेत,उपाययोजना व सूचना ग्रामस्थांना दिल्या.

यामध्ये दिलीप पवार यांनी सांगितले की,गावात ग्रामसुरक्षा यंत्रणा सर्वप्रथम कामाला लागली पाहिजे गावातील जास्तीत जास्त ग्रामस्थांनी या यंत्रणेत सहभागी झाले पाहिजे,आपला गाव ही आपली जबाबदारी आहे हे तरुणांनी लक्षात घेतले पाहिजे.गावातील वाड्या वस्त्या येथे रोज ग्रामस्थांनी व गावातील तरुणांनी गस्त घातली पाहिजे,गस्त घालत असताना ग्रामपंचायतीने ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या सदस्यांना टॉर्च,टीशर्ट,लाठी काठी असे साहित्य दिले पाहिजे.जर गावात वाड्या वस्तीवर किमान ५ ते १० जणांनी गस्त घातली,तरी देखील चोरींच्या घटनांना आळा बसेल. शेठफळगडे हे जास्त लोकसंख्या असणारे गाव असल्याने,या ठिकाणी १० ते १५ सीसीटिव्ही कॅमेरे येत्या काळात बसविण्यात येणार असून,गावालगतच साखर कारखाना आहे आता कारखाने सुरू झाले आहेत बाहेरच्या गावावरून ऊसतोड मजूर मोठया प्रमाणावर येत असतात त्या मजुरांची माहिती,यामध्ये आधारकार्ड हे ग्रामपंचायतीने घेतले पाहिजे,यामुळे जर काही अनुसूचित प्रकार घडल्यास त्या माहितीचा भविष्यात उपयोग होऊ शकतो.

तसेच गावात काही भांडण,मारामाऱ्या,छेडछाड अवैध धंदे वाढू नये यासाठी ग्रामपंचायतीने व ग्रामस्थांनी सतर्क राहिले पाहिजे.यापुढे बोलताना पवार यांनी सांगितले की मी शासनाचा पगार घेतो मी जनतेचा सेवक आहे,तुमच्या बरोबरीने मला काम करायचं आहे तुम्ही एक पाऊल पुढे या मी तुमच्यासाठी १० पाऊले पुढे येईल.या गावावर माझ विशेष प्रेम आहे आणि इथे जर चुकीच्या गोष्टी होत राहिल्या तर मला खंत वाटत राहील मी रात्री अपरात्री तुमच्यासाठी हजर आहे.तुम्ही फक्त साथ द्या आपण मिळुन या अशा प्रकरणाला आळा घालू अशी ईच्छा दिलीप पवार यांनी व्यक्त केली.दौंड येथे चक्क पोलिसाच्या घरीच चोरी झाली हे अत्यंत गांभीर्याने आपण घेतल पाहिजे असे सांगितले पुढे बोलताना सांगितले.अट्रोसिटी कायदा हा अत्यंत चांगला कायदा आहे,याचा सदुपयोग झाला पाहीजे गावातील राजकारणामुळे याचा दुरुपयोग होता कामा नये अशा,सूचना शेठफळगडे गावात झालेल्या बैठकीत केल्या.यावेळी या बैठकीला शेटफळगडे गावचे सरपंच संतोष वाबळे, उपसरपंच अजित कुंभार,पोलीस पाटील संभाजी सवाणे, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ सवाणे,माऊली वाबळे, मा.सदस्य दत्तात्रय शिरसट,नवनाथ शेलार गावचे आजी माजी सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *