मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
ठाकरे कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अशी भाषा करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रात आमच्या भगवाधारी साधूंना ठेचून मारायला आता दीड वर्ष होत आलं पण त्यांच्या हत्यार्यांना आजपर्यंत शिक्षा होऊ शकली नाही, साधं त्यांच्याविरोधात आरोपपत्र सुद्धा व्यवस्थित दाखल होऊ शकलं नाही दुसरीकडे महाराष्ट्रात येऊन हिंदू समाजाला सडका म्हणणारा शर्जील उस्मानी आज मोकाट फिरतोय, त्याला कोणताही दंड केला जात नाही.
आणि वरून हिंदुत्वाचा आव आणता, तुमच्या ढोंगी हिंदुत्वाचा बुरखा कालच्या दसरा मेळाव्यात फाटला आहे.एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री हा त्या राज्याचा कुटुंबप्रमुख असतो पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कुटुंब हे केवळ ठाकरे कुटुंब आहे, महाराष्ट्र हा त्यांच्या कुटुंबाचा भाग नाही हे काल त्यांनी सिद्ध केलं. महाराष्ट्राचं हे दुर्दैव आहे की इतके स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचे ‘मुख्यमंत्री’ उद्धव ठाकरेंच्या रूपाने महाराष्ट्राला मिळाले आहेत.असा घणाघाती आरोप भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर केला.