कटफळ येथील जानाई देवीच्या यात्रा उत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्याचा कटफळ ग्रामपंचायतीचा निर्णय….!!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

बारामती तालुक्यातील कटफळ येथील जागृत देवस्थान असलेल्या जानाई देवी देवस्थानचा दर वर्षी होणारा यात्रा उत्सव हा अतिशय मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.मात्र गेल्या दोन ते तीन वर्षपासून संपूर्ण भारतात नव्हे,तर जगात कोरोना विषाणुने थैमान घातले आहे,यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.आणि याच पार्श्वभूमीवर कटफळ येथील जानाई देवीच्या दरवर्षी प्रमाणे होणाऱ्या यात्रा उत्सवात कोणत्याही प्रकारचे सांस्कृतिक व इतर कार्यक्रम घेणार नसल्याचे कटफळ ग्रामपंचायतीच्या वतीने तालुका पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हणटले आहे.

कटफळ येथील असणाऱ्या जानाई देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा ‘क’ दर्जा प्राप्त झाला असून,गावात दरवर्षी यात्रा उत्सव मोठ्या धूम धडाक्यात साजरा केला जातो,यावेळी लाखोंच्या संख्येने यात्रेकरूंसह आसपासच्या गावातील पालख्या येत असतात, यामुळे गावात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते.आणि याच पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये,कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी कटफळ ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयाचे ग्रामस्थांकडून आणि पोलीस प्रशासनाकडून कौतुक केले जात आहे.कटफळ गावाचा यात्रा उत्सव दि.१६/१०/२०२१ पासून सुरू होत आहे.व २०/१०/२०२१ हा यात्रेचा मुख्य दिवस आहे.यामुळे या दिवशी भाविकांनी व नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहन देखील तालुका पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *