“वैचारिक श्रीमंती ही संपत्तीपेक्षा वाचनाने घडते,प्रा.रवींद्र कोकरे यांचे प्रतिपादन…!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

प्रत्येक माणसाची वैचारिक श्रीमंती ही धन संपत्तीपेक्षा वाचनाने घडते.आपल्या प्रत्येकांच्या घरात देव घराबरोबरच पुस्तक घर असावे. वाचन हे सांस्कृतिक वैभव असून त्यानेच आपले जीवन समृद्ध होणार.पुस्तकांची मैत्री साऱ्या नात्यातील श्रेष्ठ आहे”असे प्रतिपादन ग्रामीण कथाकार प्रा.रवींद्र कोकरे यांनी केले.जय तुळजा भवानी शारदिय महोत्सव अहिल्यानगर (पणदरे) येथे वाचन प्रेरणा दिनानिमित्त वाचन संकल्प पार पडला.

नवरात्रीत डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्तानं पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना पुस्तक,वह्या व लेखणी भेट देऊन त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव दिला.वाढदिवस केक न कापता फळे कापून व पुस्तक भेट देऊन मंडळाने उपक्रम सुरु केला आहे. योगासने,प्राणायाम यासह हास्यदान सुरु आहे.हळदी कुंकू यातून महिलांचे विचार प्रदान सह मनमोकळे मनोगत दिशादर्शक आहे.शालेय मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम,अन्नदान यासह गुणवंताचा सत्कार असे आयोजन केले होते.” प्रा रवींद्र कोकरे यांनी म्हटले आहे.कार्यक्रमास पंचक्रोशीतील भाविक महिला,युवक,युवती यांची उपस्थिती कोरोनाचे नियम पालन करुन होती.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *