संजय राऊत तुमच्या सारख्या हुजऱ्यांना वाघाच्या शेपटाचीही उपमा देता येणार नाही,गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल…!!!


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

दसऱ्याच्या मुहूर्तावर जनतेला गोपीचंद पडळकरांनी शुभेच्छा देत महाविकास आघाडी सरकारवर आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला.माझा महाराष्ट्र खरोखरच सोन्यासारखा आहे.तुमचे महाविकास आघाडीचे सरकार दगाफटक्यातून आल्यापासून महाराष्ट्राला लुटण्याची एकही संधी सोडलेली नाही.मागील दोन वर्षांमध्ये कोकणामध्ये दोन वेळा चक्री वादळ आलं तरी शेतकऱ्यांची पीक कधी ओल्या दुष्काळानं तर कधी दुष्काळानं मातीमोल झाली.

स्वप्निल लोणकर सारख्या होतकरू तरुणाला महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे आत्महत्या केली.
महाराष्ट्राला लाला परीची सेवा देणाऱ्या २८ कर्मचाऱ्यांनी पगार वेळेत मिळत नाही,म्हणून आत्महत्या केली.अनेक बारा बलुतेदार आणि भटक्यांवरती आर्थिक चणचणीमुळे आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.हे सर्व सुरू असताना,तुमची फक्त कागदी घोडे नाचवता,प्रत्यक्षात मदत मात्र दिली जात नाही.
सर्वसामान्यांचा निर्णयाचा विषय आला तर तुमच्या आघाडीमध्ये बिघाडी होते.

परंतु बदल्याचा मलिदा खाण्यासाठी तुमच्या मध्ये एक वाक्यता होते.म्हणून तर तुम्हाला दिवाळी दसरा रोजच आहे. यानंतर संजय राउतांवर निशाणा साधत,जनाब संजय राऊत मेंढ्या ह्या शेतकऱ्यांच्या जीविकेचं साधन आहेत.त्या ऊबही देतात आणि दूधही देतात.हे महावसुली वाल्यांना कळणार नाहीये…या महाराष्ट्रात एकमेव वाघ होऊन गेले ते म्हणजे हिंदूंचे हिंदूहृदय सम्राट म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे तुम्हाला वाघाच्या शेपटीची उपमा देता येणार नाही.कारण तुम्ही तुंमच शेपूट ही …..यावर मात्र त्यांनी हसत प्रतिक्रिया दिली नाही.मात्र गोपीचंद पडळकरांना नक्की काय म्हणायचं होत ? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *