राष्ट्रवादीत असतानाही चित्रा वाघ लोकांना पैशासाठी ब्लॅकमेल करायच्या,राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांचा गंभीर आरोप..!!


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

चित्रा वाघ यांनी ट्विट करत महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत,पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे… अध्यक्ष लवकरात लवकर नेमावा,पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शूर्पनखा’ बसवू नका..अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल.. अशा प्रकारे ट्विट केल्यानंतर यावर राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण,यांनी चित्रा वाघ यांच्या टिकेला उत्तर देताना,चित्रा वाघ यांची अवस्था म्हणजे,कोल्ह्याला द्राक्ष आंबट अशी झालेली आहे..जोरजोरात उड्या मारायच्या आणि,द्राक्षाच्या घडापर्येंत उडी जात असताना,द्राक्षे आंबट आहेत असं म्हणायचं.. त्या जर आज राष्ट्रवादी मध्ये असत्या तर त्यांना काय काय मिळालं असत,हे आठवूण त्यांना खूप वाईट वाटतं आहे..आणि म्हणून त्या कोणाचा तरी उल्लेख जाणीवपूर्वक शुर्खपना करीत आहेत.असा जोरदार टोला राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांना लगावला.

“शुर्खपणा” ही तरी वाईट होती का ? ती देखील एक महिलाच होती.एका महिलेने एखाद्या महिलेविषयी अशा प्रकारे बोलणं बरोबर आहे का ? असा सवाल देखील चव्हाण यांनी उपस्थितीत केला.चित्रा वाघ यांनी आतापर्यंत जेवढ्या पत्रकार परिषदा घेतल्या,त्या पत्रकार परिषदेत मी ह्याला बघून घेईन,त्याला बघून घेईन..आणि त्या सर्रास पुरुषांना ब्लॅकमेलिंग करत आहे..याच तंत्र त्यांना फार अवगत झाल आहे.भाजपाच्या आमदारा देखील त्यांनी अशाच प्रकारे ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केला असल्याचा गंभीर आरोप विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांच्यावर केला.जेव्हा चित्राताई महिला आयोगाच्या सदस्य होत्या,त्यावेळी त्यांना त्यातलं कळायला लागल्यानंतर असे प्रकार करणे चुकीच आहे.अस देखील चव्हाण यांनी स्पष्टप केलं.भाजपवर निशाणा साधत,आज भाजपल बर वाटत आहे,कारणं आज त्या दुसऱ्या कोणावर तरी आरोप करीत आहेत.त्यांनी भाजपच्या आमदारावर देखील अत्याचाराचे आरोप केले होते,हे देखील चव्हाण यांनी स्पष्ट केले.

यामध्ये माजी मंत्री राठोड,राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांचा काही दोष नाही..ह्याला बघून घेते ? त्याला बघून घेते..ह्याला ब्लॅकमेलिंग करणे हा नक्की काय प्रकार आहे ? असा आरोप देखील चव्हाण यांनी केला.कोणत्याही पक्षात काम करत असताना,त्यांना हे कळायला पाहिजे,की आपण कोनाविषयी काय बोलतो हे देखील कळलं पाहिजे..एखाद्या पुरुषाचं आयुष्य आपण बरबाद करतोय..आणि मग त्याला आवरण द्यायचं की,मी महिला अत्याचाराविषयी बोलते,यामुळे त्यांनी आपण काय आहे हे लक्षात ठेवले पाहिजे,असा सल्ला देखील चव्हाण यांनी चित्राताईंना दिला.ह्याला त्याला ब्लॅकमेलिंग करून,एखादं पद प्रतिष्ठा आपल्या पदरात पाडून घेणं हे चुकीचं आहे,आणि आम्ही आता ते खपवून घेणार नाही, महिलेने आपली मर्यादा पाळली पाहिजे,ती चित्रा वाघ यांनी देखील पाळली पाहिजे..चित्राताई पुरुषांना ब्लॅकमेलिंग करणं हे बरोबर नाही ? असा टोला देखील चित्रा वाघ यांना लगावला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *