बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
गेल्या चार महिन्यांपासून सांगवी बारामती,शारदानगर,माळेगांव परिसरामध्ये घरफोडी,चोरीचे प्रमाण वाढल्याने,याबाबत तपास करीत असताना,आरोपी चेक करणे,सीसीटीव्ही कॅमेरे चेक हे सुरू केले असता,सांगवी येथील वरूण तावरे यांचे विजय इंडस्ट्रीज नावाच्या कंपनीमध्ये घरफोडी चोरी केल्याबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.या गुन्हयाबाबत माळेगांव चौकीचे तपास पथकाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देवून आजू बाजूच्या सिसिटीव्ही व तांत्रीक माहीतीच्या आधारे शोध सुरू केला.माळेगाव पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा हा सांगवी येथील महेश भिमा शिंदे व त्याच्या साथीदारांसह केला आहे.यासाठी सांगवी येथे सापळा रचत आरोपी महेश शिंदे ताब्यात घेत कोर्टात हजर केले असता,मा.न्यायालयाने आरोपीला एका दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
या आरोपीकडे तपास करत असताना,घरफोडीचा गुन्हयातील ४.५ तोळे वजनाचे २ लाखांचे दागिने जप्त करण्यात आले आहे.
तसेच आरोपीने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हददीमध्ये साठे फाटा फलटण येथील एका गार्डन परमिट रूममधून दिड लाख रूपयांपेक्षा जास्त किंमतीची दारू व घरफोडी चोरी केल्याबाबत कबुली दिली.ह्याबाबत फलटण ग्रामीण पोलीस
ठाण्यात गुन्हा दाखल आहे.या आरोपीने घरफोडीच्या गुन्हयातील चोरलेले सोन्याचे दागिने बाळकृष्ण तात्याबा यादव (रा.सांगवी,ता.फलटण,जि.सातारा) यांच्यामार्फत विक्री केल्याने त्याला देखील या गुन्हयाच्या तपासकामी अटक करण्यात आली असून,या गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश विधाते हे करीत आहेत.हा आरोपी फलटण शहर पोलीस स्टेशन व फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील आरोपी असून त्याच्यावर ११ घरफोडीचे व एका दरोडयाचा गुन्हा दाखल आहे.
ही कामगीरी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधिक्षक बारामती विभाग मिलींद मोहीते, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग गणेश इंगळे, बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे,पोलीस हवालदार रावसाहेब गायकवाड, शशिकांत वाघ,विजय वाघमोडे,विनोद लोखंडे,राहुल पांढरे,नंदू जाधव,राजेंद्र काळे, दत्तात्रय चांदणे,प्रशांत राऊत दिपक दराडे यांनी केली आहे.