बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
बारामती व करमाळा या दोन ठिकाणी भोंदूबाबा मनोहर भोसले यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले होते.त्यातील बारामती येथील प्रकरणात मनोहर भोसले यांना शर्तीच्या अधीन राहून जामीन मंजूर करण्यात आला आहे अशी माहीती अॅड.रोहित गायकवाड यांनी दिली आहे.तर करमाळा येथील गुन्ह्याबाबत २० ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. मंगळवारी वाढीव पोलीस कोठडी बाबत रिविजन मागणी बार्शी सत्र न्यायालयाने फेटाळली होती.त्यामुळे आता वीस तारखेच्या सुनावणीवर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.बारामती येथील पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर भोसले यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल आहे.
त्यातील मनोज भोसले यांना बारामती न्यायालयाने सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावली होती.त्याचवेळी करमाळ्यातील गुन्ह्याप्रकरणी करमाळा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व न्यायालयात हजर केले होते.सात व चार दिवसांच्या कोठडी नंतर मनोहर भोसले यांना एक ऑक्टोबर रोजी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहेत.२० ऑक्टोंबर रोजी करमाळा येथील गुन्ह्याबाबत बार्शी येथील सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.यावेळी भोसले यांचे वकील ऍड रोहित गायकवाड हे भोसले यांच्या जामिनासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान बारामती येथे झालेल्या गुन्ह्याप्रकरणी मनोहर भोसले यांना जामीन मंजूर झाला आहे.त्याठिकाणी भोसले यांचे वकील ऍड रोहित गायकवाड यांनी सुप्रीम कोर्ट यांच्या एका आदेशाप्रमाणे सबळ पुराव्या अभावी जामीन नाकारू शकत नाही.तसेच इतर कारणे कारणांचा दाखला देत जामीन मागितला होता.तर काही शर्तीच्या अधीन राहून मनोहर भोसले यांना त्याठिकाणी अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे
त्यामध्ये भोसले हे आपल्या दोन्ही मठाकडे जाऊ शकत नाहीत किंवा जे तक्रारदार किंवा साक्षीदार आहेत त्यांच्यावर दबाव टाकू शकत नाहीत.यासह ५ अटींसह भोसले यांना जामीन मंजूर आला आहे.