राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्यमान नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल…!!


दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

दौंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान नगरसेवक व माजी
उपनगराध्यक्ष राजेश जाधव याने व्याजाने दिलेले पैसे वसूल करण्यासाठी,माझे व्याजाने घेतलेले पैसे दे नाहीतर,मग मला शरीरसुख दे असे म्हणत एका महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या सावकाराच्या विरोधात एका महिलेने विनयभंग केल्याप्रकरणी दौंड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.राजेश शामराव जाधव (रा.गोवा गल्ली,दौंड)यांच्या विरोधात खाजगी सावकारीचा ही गुन्हा दाखल झाल्याने येथील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार,फिर्यादी महिलेला राजेश जाधव यांनी डिसेंबर २०१९ रोजी दोन लाख रुपये महिना ८ टक्के व्याजाने दिलेले होते.

फिर्यादीस व्याजाचे पैसे देणे शक्य न झाल्यामुळे राजेश जाधव यांनी फिर्यादीच्या बहिणीच्या घरामध्ये फिर्यादीस अश्लील भाषेत दमबाजी केली.तुला नागडी करून दौंड मध्ये फिरवीन,मी पैसे कसे वसूल करतो हे साऱ्या दौंडला माहित आहे.अशी भाषा वापरून,तुला जर माझे पैसे देता येत नसतील तर मला वेळ दे म्हणत जाधव यांनी फिर्यादी महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली व तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.या महिलेने दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद देत,राजेश जाधव याच्यावर महाराष्ट्र सावकारी अधिनियम कायद्यांनव्ये आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून,आरोपी जाधव हा दौंड नगरपालिकेचा माजी उपनगराध्यक्ष असून,तो सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विद्यमान नगरसेवक आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *