फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई…
फलटण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज…
फलटण ग्रामीण पोलिसांनी सरड्यातुन अकलूज या ठिकाणी बेकायदेशीर जनावरे कत्तल करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या पिकअप गाडीसह मुद्देमाल हस्तगत केला असून,फलटण ग्रामीण पोलिसांनी आरोपी गफूर हुसेन शेख,वय.४२ वर्ष,सुलेमान गफूर शेख,वय.२७ वर्ष ( दोघेही रा.सरडे,पाल, ता.फलटण,जि.सातारा ) या दोघांना ताब्यात घेत,महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चा सुधारित कायदा कलम ५ (अ),५ (ब),९ व पशु क्रूरता अधिनियम १९६० चे कलम ११ अ,ड,इ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सरडे ता.फलटण या ठिकाणाहून,आरोपी गफूर हुसेन शेख,वय.४२,सुलेमान गफुर शेख,वय.२७ वर्ष,(दोघेही रा.सरडे ता. फलटण ) यांनी पांढऱ्या रंगाच्या पिकअप गाडी क्र.एम.एच ११ टी ४९१२ व एम.एच १० सी आर ००१९ या गाडीमध्ये कोणतेही जनावरे खरेदी पावती नसताना,सुमारे १७ जर्सी जातीची लहान खोंडे दाटीवाटीने कोंबून ठेवलेली कोणतीही परवानगी नसताना कत्तलीसाठी डांबून ठेवलेली दिसुन आली,त्यांना खाण्यापिण्याची कोणतीही सोय न करता ती जनावरे बेकायदेशीर कत्तल करण्यासाठी घेऊन जात असल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलमा अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाई मध्ये १ लाख ७० हजार किमतींची १७ जर्सी गायीची खोंडे,पाच लाख रुपये किमतीचे दोन पिकअप असा सुमारे ११ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.