इंदापूर (बेलवाडी) : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बेलवाडी येथे इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत डोळे तपासणी शिबिरचे उद्घाटन शर्मिला पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.या शिबिरामध्ये ३०० लोकांची तपासणी करण्यात आली यामध्ये ५७ लोकांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे.तर ६२ लोकांना चष्मे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन इंदापुर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष व शरयू फाउंडेशनचे सदस्य ॲड.शुभम निंबाळकर यांनी केले होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे होते.या कार्यक्रमासाठी, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,ज्येष्ठ नेते डी.एन जगताप ॲड.रणजीत निंबाळकर, कांतीलाल जामदार,अनिल काटे,राजेंद्र निंबाळकर,राहुल घुले, महादेव कचरे, अश्विनी खरसे,सचिन सपकाळ,विक्रम निंबाळकर, माणिक जामदार, नानासो पवार, चंद्रकांत जामदार, हनुमंत खैरे, अमरसिंह पाटील,योगेश पाटील,अमरजित खारतोडे, ओंकार जामदार, आदिजन उपस्थित होते.