बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथील शेतकऱ्यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना आणि काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीने ‘महाराष्ट्र बंद’ला आज बारामती येथील भिगवण चौक याठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.या बंदला बारामतीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून,बारामती मधील व्यापारी महासंघाने देखील या बंदला पाठिंबा दिला असून बारामतीतील सर्वच्या सर्व दुकाने आज बंद ठेवण्यात आली आहे.या घटनेचा निषेध करण्यात आला.
“मोदी सरकारचा करायचं काय खाली मुंड वर पाय”,”मोदी सरकार हाय हाय”..”जय जवान जय किसान”अशा शब्दांत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.या बंदमध्ये महाविकास आघाडीतील तिन्हीही पक्ष पूर्ण ताकदीनिशी उतरले असुन, अन्नदात्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून हत्या करण्यात आली.या मुद्द्यावर देशातील जनतेला जागे करण्यासाठी महाराष्ट्रात बंद पुकारण्यात आला आहे.