शिक्रापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
शिक्रापूर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार,कोरेगाव भीमा येथील आनंद टॉवर मधील सुधाकर ढेरंगे यांच्या बिल्डिंग मध्ये घरफोडीच्या हेतूने शिरलेल्या आरोपी लखनसिंग राजपूत सिंग दुधानी,वय.३१ वर्ष,( रा.सर्वे नं.११०,अंध हायस्कूल पाठीमागे रामटेकडी पुणे ) रवी सिंग श्यामसिंग कल्याणी,वय.२२ वर्ष ( रा.सर्वे नं.११०,मारुती शोरूमजवळ,सोलापूर रोड,रामटेकडी, पुणे )हुकूमसिंग रामसिंग कल्याणी,वय.३० वर्ष,(रा.सर्वे नं.११० मारुती शोरूमजवळ सोलापूर रोड,रामटेकडी,पुणे )यांना धारदार शस्त्रांसह ताब्यात घेण्यात आले असून,त्यांच्याविरोधात शिक्रापूर पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ४०१,५११,(३४) सह भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिकापूर पोलीसांना रात्रगस्त करीत असताना मिळालेल्या माहितीनुसार,एका इको गाडी क्र. एम.एच.१२ आर एफ २०४५ यामधून तीन अनोळखी इसम हे कोरेगाव भिमा येथील आनंद टॉवर मधील बिल्डींगमध्ये शिरलेले आहेत.यानुसार संशयित अनोळखी इसमांचा शोध घेण्यासाठी जात असताना दुस-या मजल्यावरील एक खोलीला बाहेरून कुलूप लावलेले व इतर तीन खोल्यांना बाहेरून कडी लावलेल्या दिसून आल्या,त्यानंतर तिस-या मजल्यावर जिन्यामध्ये अनोळखी इसमापैकी दोघांचे हातात धारधार शस्त्र व एकाचे हातामध्ये लोखंडी कटावणी दिसून आली.त्यापैकी दोघांनी पोलीसांसमोर येण्यापूर्वी स्वत:च स्वत:ला त्यांचेकडील धारधार शस्त्राने कपाळावर व छातीवर किरकोळ जखमा करून घेतल्याचे दिसून आले.पोलिसांनी सर्व्हिस पिस्टल रोखत त्यांना शरण येण्यास सांगितले असता त्यांनी त्यांचेकडील हत्यारे जमिनीवर ठेवून पोलीसांसमोर शरण आले.
यानंतर या इसमांना पोलीस व खाजगी व्यक्तींच्या मदतीने दोन व्यक्तींना पंच घेवून पंचनामा करण्यात येऊन,त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातील धारदार शस्त्र व इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.यातील आरोपींवर याअगोदरही पुणे शहर,कराड शहर,सातारा ग्रामीण व शहर,रायगड या ठिकाणी जबरी चोरी,घरफोडी आर्मक्ट अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून काही गुन्ह्यात हे आरोपी फरार आहेत.आरोपींच्या ताब्यातील इको गाडी क्र.एम एच.१२ आर एफ २०४५ हे वाहन आरोपींनी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हददीतुन चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.तसेच त्यांच्या ताब्यात मिळुण आलेला मुददेमाल हा लोणीकंद पोलीस स्टेशन हददीमध्ये घरफोडी चोरी मधील असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्याबाबत संबंधित पोलीस स्टेशन येथे गुन्हे नोंद आहेत.
या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पठारे हे करीत आहेत.ही कामगिरी पुणे ग्रामीन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग मिलींद मोहीते,उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड राहुल धस शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे,यांच्या मार्गदर्शनाखाली शिकापुर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी,सहाय्यक फौजदार अविनाश थोरात,पोलीस हवालदार जितेद्र पानसरे,साळुंखे पोलीस नाईक दांडगे,होनमाने, पारखे,व होमगार्ड बचे यांनी केलेली आहे.