फलटण पोलीसांनी अवैध गुटख्यावर कारवाई करत तब्बल १३ लाख ३९ हजारांचा मुद्देमाल केला हस्तगत…!!!


फलटण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

फलटण शहर पोलीसांनी मोठ्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून अवैध गुटख्याची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करत गुन्ह्यातील वाहनांसह तब्बल १३ लाख ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.यामध्ये समीर खानसाहेब आत्तार (वय.३२),संग्रामसिंह ज्ञानदेव बरकडे दोघेही रा.जावली,ता.
फलटण यांना ताब्यात घेत दुसऱ्या कारवाईत आरोपी महेंद्र आगमोगम कुंडवर उर्फ आण्णा (वय. ३६)रा.लक्ष्मीनगर,फलटण याला देखील ताब्यात घेतले,असून याबाबत अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी रोहिदास सोनवणे यांनी फिर्याद दिली असून फलटण शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत फलटण पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांना गोपनीय बातमीदारामार्फत फलटण शहरातील नाना पाटील चौक व दहिवडी चौक येथून अवैध गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार किंद्रे यांनी दोन वेगवेगळी पथके तयार करून नाना पाटील चौक व दहिवडी चौक येथे पाठवली.महिंद्रा एसयुव्ही गाडी क्र.एम.एच.१० बी.एफ.७८७८ ही संशयित गाडी नाना पाटील चौक येथे शिवाजी चौकाच्या दिशेकडून आली असता त्या ठिकाणच्या पथकाने गाडीची झडती घेतल्यानंतर गाडीमध्ये विमल नावाचा गुटखा,पान मसाला,सुगंधीत तंबाखु व इतर गुटखा मिळून आले.या गाडीतील आरोपींना ताब्यात घेतले असता,दुसऱ्या ठिकाणच्या कारवाईत दहिवडी चौक येथे कोळकीकडून आलेल्या एम.एच.४ सी.जे.५४८३ क्रमांकाच्या मारुती सुझूकी वॅगनर गाडीला अडवून पोलीसांनी झडती घेतली असता या गाडीमध्ये देखील विमल गुटखा,पान मसाला,सुगंधीत तंबाखू, इतर गुटखा असे प्रतिबंधित असणारे अन्न पदार्थ आढळून आले.

या दोन्ही कारवाईतील चारचाकी वाहने व प्रतिबंधीत असणारा गुटखा असा मिळून १३ लाख ३९ हजारांचा मुद्देमाल पोलीसांनी ताब्यात घेतला असून,फलटण शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुरज शिंदे हे करीत आहेत.ही कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल,अप्पर पोलीस अधिक्षक अजित बोराडे, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण तानाजी बरडे,फलटण शहर पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ गायकवाड,पोलीस नाईक शरद तांबे,पोलीस हवालदार चंद्रकांत धापटे,रमेश फरांदे,महिला पोलीस हवालदार अनिता पानसरे,अशोक वाडकर,पोलीस कॉन्स्टेबल सुजित मंगवाडे,अच्युत जगताप यांनी सहभाग घेतला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *