औरंगाबाद : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत सहभागी होऊन बीड जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा आढावा सादर केला.
बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात सातत्याने झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी व अन्य सर्वच बाधित घटकांना भरभरून मदत मिळावी अशी आग्रही मागणी यावेळी केली. राज्य सरकार याबाबत सकारात्मक असून पुढील याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केले.
या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार,सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे,आरोग्यमंत्री राजेश भैय्या टोपे,अशोकराव चव्हाण सुभाषजी देसाई,खा.डॉ.फौजिया खान,सतीश भाऊ चव्हाण तसेच कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मुख्य सचिव सचिव,विभागीय आयुक्त व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.