केंद्र सरकार व आयकर विभागाच्या विरोधात नोंदवला निषेध…
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या संबंधित विविध कंपन्या,कार्यालये आणि वक्तींच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणांनी धाडा टाकल्या असून,गेल्या ४८ तासांपासून तपास देखील सुरू आहे.यामध्ये अहमदनगर येथील अंबालिका साखर कारखाना,बारामतीतील श्रायबर डायनामिक्स डेअरी, दौंड तालुक्यातील दौंड साखर कारखाना येथे छापा सत्र सुरू सुरू असून, नंदुरबारमधील आयन मल्टीट्रेड साखर कारखान्यावर आयकर विभाग कारवाई केली आहे.तसेच अजित पवारांच्या पुण्यांमध्ये राहणाऱ्या बहिणींच्या कार्यालयावर देखील तपास यंत्रणेने धाडी टाकल्या असुन, अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या मुंबई मधील कार्यालयात देखील सलग दोन दिवस केंद्रीय तपास यंत्रणेचा सुरूच होता.
यावर कालपासून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या समर्थनात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर येऊ लागले आहे,काल देखील पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन अजित पवारांच्या समर्थनात आंदोलन केले होते व याच पार्श्वभूमीवर आज बारामती मधील भिगवण चौकात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या समर्थनात राष्ट्रवादीचे मोजकेच कार्यकर्ते रस्त्यावर आले आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी देखील सुरू होती ‘अजित दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’ ‘हमारा नेता कैसा हो अजित दादा जैसा हो’ अशा जोरदार घोषणा देखील देण्यात आल्या.तसेच we support ajit dada’ अशा प्रकारचे बॅनर देखील दिसून आले,मात्र यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा ताळमेळ कुठेही दिसून आला नाही.
यामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या विविध चार ते पाच गटांकडून वेगवेगळ्या प्रकारे घोषणाबाजी केली जात होती, यामुळे हे नक्की समर्थन होते ? की फक्त निव्वळ बॅनरबाजी होती असा प्रश्न बारामतीकरांना पडलेला आहे ? या मोजक्याच कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे मात्र बारामतीमध्ये वाहतुकीची तब्बल अर्धा तास कोंडी झाली.यामध्ये राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी देखील किरीट सोमय्या यांच्या विरोधात घोषणाबाजी करत, तोतल्या तुझं करायच काय ? खाली मुंड वर पाय ? अशा घोषणा देण्यात आल्या,व केंद्र सरकारचा व आयकर विभागाचा निषेध नोंदवण्यात आला.यामुळे अजित पवारांच्या समर्थनात आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये देखील गटबाजी दिसून आली.