मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज ( संपादक : विकास कोकरे )
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांच्या प्रदिर्घ अशा कारकिर्दीत देशाच्या विकासावर दूरगामी परिणाम करणारे अनेक निर्णय झाले. अनेक नव्या उपक्रमांना चालना मिळाली.त्यांच्या या लोकोत्तर कार्याला सलाम करण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई यांच्याकडून ‘शरद पवार इनस्पायर फेलोशीप’ची घोषणा करण्यात आली.ही फेलोशीप शेती,साहित्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी देण्यात येणार आहे.शेती क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काहीतरी नवीन करण्याची धमक असणाऱ्या ८० गुणवंत तरुण-तरुणींसाठी ‘शरद पवार इनस्पायर फेलोशीप इन ॲग्रीकल्चर’ प्रदान करण्यात येणार आहे.
याअंतर्गत आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञांचे सहकार्य व मार्गदर्शन फेलोंना उपलब्ध करुन देण्यात येईल.याशिवाय त्यांना कृषी क्षेत्रातील नेतृत्व करण्यासाठी सज्ज करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.यासह साहित्य क्षेत्रातील प्रयोगशील व दर्जेदार लिखाण करणाऱ्या दहा तरुण-तरुणींना शरद पवार लिटररी फेलोशीप (शरदचंद्र पवार साहित्य पाठ्यवृत्ती) प्रदान करण्यात येणार आहे.त्यांना नामवंत साहित्यिकांचे मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्यात येणार असून साहित्य प्रकाशित करण्यासाठी सहकार्य देखील मिळणार आहे.
या दोन्ही फेलोशीपसाठी दि. ८ ऑक्टोबर २०२१ पासून http://www.sharadpawarfellowship.com या वेबसाइटवर जाऊन विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे.अर्ज भरण्याची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर २०२१ आहे.या अर्जांची तज्ज्ञ समिती छाननी करणार असून मुलाखतीनंतर फेलोंची निवड करणार आहे.या नावांची घोषणा १ डिसेंबर रोजी करण्यात येईल.शरद पवारांच्या वाढदिवशी म्हणजेच १२ डिसेंबर २०२१ रोजी ती फेलोंना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येईल.एमकेसीएल फौंडेशन,बारामती अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट यांचे फेलोशीप उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य लाभले.शरद पवार इनस्पायर फेलोशीप इन एज्युकेशनचे मुख्य समन्वयक विवेक सावंत हे असणार आहेत.
दरम्यान,शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने व कला-क्रीडा आदी माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांसाठी ‘शरद पवार इनस्पायर फेलोशीप इन एज्युकेशन’ देण्यात येणार असून त्याची घोषणा डिसेंबर २०२१ ला करण्यात येईल व २० शिक्षकांना ही फेलशिप देण्यात येईल. काहीतरी वेगळं करण्याची उमेद व त्यासाठी कष्ट करण्याची तयारी असणाऱ्या महाराष्ट्रातील तरुण तरुणींना आवाहन आहे की त्यांनी कृपया या संधीचा लाभ घेऊन जास्तीत जास्त संख्येने अर्ज सादर करावेत.याप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे, फेलोशीपच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ.अनिल काकोडकर,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष हेमंत टकले,ज्येष्ठ विश्वस्त बी. के. अगरवाल, ॲग्रीकल्चर फेलशिपचे मुख्य समन्वयक व ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे सीईओ निलेश नलावडे, साहित्य फेलोशिपचे मुख्य समन्वयक प्रा. डॉ.नितीन रिंढे,माझे सर्व सहकारी,पत्रकार बांधव उपस्थित होते.डॉ काकोडकर यांनी यासाठी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून खास वेळ देण्याचे मान्य केले याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.