पाहुणे अजूनही घरी आहेत,ते आपलं काम करीत आहेत…ते गेल्यावर मी माझी भूमिका मांडेन : अजित पवार…!!


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित असणाऱ्या कंपन्यांवर आणि संबंधित व्यक्तींच्या घरांवर आयकर विभागाने छापेमारी सुरू केली असून,आज सलग दुसऱ्या दिवशी ही आयकर विभागाकडून धाडसत्र सुरु आहे.याशिवाय अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या कार्यालयावर देखील आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत.आयकर विभागाच्या छापेमारी नंतर पुण्यात आज पत्रकारांशी बोलताना अजित पवारांनी,मार्मिक प्रतिक्रिया देत..पाहून अजूनही घरात आहेत..ते आपलं काम करीत आहेत..आणि ते गेल्यानंतरच मी माझी भूमिका मांडेन,आणि यानंतर जे उघड होईल त्यात..दूध का दूध और पाणी का पाणी होईल..

अजित पवारांच्या संबंधित कंपन्यांवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. सलग दुसऱ्या दिवशी आयकरचं धाडसत्र सुरु आहे. याशिवाय अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयावरही आयकर विभागाने धाडी टाकल्या.मुंबईतील नरिमन पॉईंट इथे असलेल्या निर्मल बिल्डिंगमध्ये पार्थ पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाची छापेमारी दुसऱ्या दिवशीही सुरू आहे.काही महत्वाची कागदपत्रे आयकर विभागाची टीम घेऊन गेल्याची माहिती मिळत आहे.महत्त्वाचं म्हणजे गेल्या २६ तासांपासून छापेमारी सुरु आहे. ७ तारखेला सकाळी ६ वाजल्यापासून सुरु असलेलं धाडसत्र आजही सुरु आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *