कापड दुकानांमध्ये तब्बल दोन कोटींचा अपहार…शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!!


फलटण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

फलटण मधील गारमेंट किंग प्लस या दुकानामध्ये सुनील मछिंद्र दोरगे, प्रसाद प्रकाश पंडित,नितीन फडतरे,सुरेश आचमे यांनी सुमित हणुमंतराव जगदाळे व त्यांचे व्यावसायिक भागीदार धोंडीराम घाडगे यांच्या मालकीचे असलेल्या गारमेंट किंग प्लस या कापड दुकानाच्या फलटण शाखेमधून मालकांचा विश्वास संपादन करून तब्बल एक कोटी ९७ लाख ५० हजार २५५ रुपयांचा अपहार केला,व काही माल वेगवेगळ्या दुकानांमधून विक्री केल्याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,सुनील मछिंद्र दोरगे (रा.यवत,ता.पुरंदर)प्रसाद प्रकाश पंडित (रा.वडूज,ता खटाव )नितीन फडतरे (रा.पुसेगाव,ता.फलटण) सुरेश आचमे,( रा.गंगाखेड,जि.परभणी) या सर्वांनी संगनमताने सुमित हणुमंतराव जगदाळे ( मूळ,रा. बिदाल,ता.माण,सध्या रा.कोळकी ता.फलटण) व त्यांचे व्यावसायिक भागीदार धोंडीराम घाडगे यांच्या मालकीच्या गारमेंट किंग प्लस या दुकानाच्या फलटण शाखेमधून विविध बँड्सच्या खरेदी म्हणजेच दुकानात आवक केलेले एक लाख ५० हजार वस्तूंच्या बारकोड पैकी दुकानाच्या बारकोड सिस्टीम मधून ४५५३० वस्तूंचे बारकोड म्हणजेच एक कोटी ९० लाख ९४ हजार ८०९ रुपयांचे बारकोड असलेल्या वस्तू डिलीट केले व ग्राहकांकडून येणारे सहा लाख ५५हजार ४४६ रुपये दुकानाच्या अकाउंटला जमा केले नाहीत असे करत,तब्बल १ कोटी ९७ लाख ५० हजार २५५ रुपयांचा अपहार केलेला असून,या गुन्ह्याचा पुढील तपास फलटण शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊळ करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *