बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कारखाने व कंपन्या आणि लोकांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी आज छापेमारी सुरु केली होती. यामध्ये अजित पवारांच्या बहिणींच्या घरावर देखील केंद्रीय तपास यंत्रणांनी छापे मारले आहेत तसेच अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांच्या कार्यालयाची देखील झाडाझडती घेतली आहे.याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी भाजप वर निशाणा साधत,जोरदार टीकाशस्त्र झाडले आहे.यात त्यांनी ‘माझ्या मते आज जे काही घडलं ते उत्तर प्रदेशच्या प्रश्नांवर माझ्यासह विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळेच हा प्रकार करण्यात आला.त्याची प्रतिक्रिया म्हणून सुरू असल्याची शक्यता आहे अशा शब्दांत शरद पवार यांनी केंद्रीय तपास यंत्रणेच्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली.
दरम्यान,महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद मिळेल स्थानिक स्वराज्य संस्थांसह काही पोट निवडणूकांमध्ये महाविकास आघाडी स्वतंत्रपणे लढूनही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तिन्ही पक्ष एकत्रित लढले तर शंभर टक्के निकाल त्यांच्या बाजूने जाईल असाहि अंदाज पवार यांनी व्यक्त केला.भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी बारामती दौरा करत पवार कुटुंबीयांवर प्रचंड हल्ला बोल केला होता,याला प्रतिउत्तर देत शरद पवारांनी किरीट सोमय्या यांनी देखील कोपरखळी मारत,काही लोक भाषणे करून अथवा पत्रकार परिषदा घेत आरोप करत असतात.ते बोलल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणा ह्या कारवाई करण्यासाठी पुढे येतात ही आक्षेपार्ह बाब असल्याचे देखील पवारांनी आवर्जून सांगितले.
तसेच आता लोकांनीच विचार करायला हवा की अशा प्रकारे केंद्र सरकार हे अधिकाराचा गैरवापर करत असून,किती दिवस सहन करायचा ? हा अधिकाराचा अतिरेक,अशी संतप्त प्रतिक्रिया देत,कर वसुली करण्यासाठी जर त्यांना काही शंका येत असेल तर त्या संबंधीची चौकशी करण्याचा अधिकार त्यांना आहे.या अधिकाराचा वापर कुणासंदर्भात करायचा,त्या संस्था किंवा त्यांच्याशी संबंधित बाबींवर केला तर योग्य आहे.पण या व्यवहाराशी दूरपर्यंत संबंध नसलेल्या मुलींवरही छापे टाकणं हा अधिकाराचा अतिरेक आहे, अशी घणाघाती टीकाही पवारांनी केलीय.