इंदापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई…चोरीच्या डिझेलसह टँकर जप्त करत १० लाख २४ हजारांचा मुद्देमाल केला हस्तगत…!!


इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

तरंगवाडी गावाच्या हद्दीतील जे.के.जगताप अँन्ड कंन्स्ट्रक्शन यांचे क्रेशर प्लॅन्टवरील महेंद्र रामचंद्र खाडे यांचे मालकीच्या पोकलेन मशीनमधील जवळपास २०० लिटर डिझेल चोरी झाल्याची फिर्याद इंदापूर पोलिस ठाण्यात दाखल झाली होती, त्यास अनुसरून इंदापूर पोलीस गस्त करत असताना पाठलाग करुन डिझेलने भरलेल्या कँन सह एक ट्रक असा तब्बल १०लाख २३ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत केला.यामध्ये ट्रक नं.MP-09 HG 0806 वरील अज्ञात चालक व त्याचा साथीदार याचेविरूध्द इंदापुर पोलीस ठाण्यात भादवि कलम ३५३,३७९,३४ मोटार वाहतुक कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी.वाय मुजावर यांनी तात्काळ सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे यांनी पथके तयार करुन तपास सुरु केला होता.त्यानंतर सोलापुर पुणे रोडने पुण्याच्या दिशेने एक ट्रक निघाला असुम त्यामध्ये चोरीच्या डिझेलचे कॅन ठेवलेले आहेत अशी माहिती इंदापूर पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली.मिळालेल्या माहितीवरुन रात्रगस्त करीत,असताना त्यांना इंदापूर शहराजवळील डोंगराई सर्कल जवळ साधरण पावणेदोन वाजण्याच्या सुमारास पुण्याकडे जाणारा एक संशयित ट्रक दिसून आला.त्यांनी ट्रकचालकास थांबविण्याचा इशारा केला.मात्र सदर ट्रक चालकाने ट्रक भरधाव वेगाने चालवुन पोलीसांचे वाहनाला कट मारून पुण्याच्या दिशेने प्रवास सुरु केला.

तत्काळ महेश माने व शिंगाडे यांनी सरकारी वाहनातून त्या ट्रकचा पाठलाग सुरू केला.मात्र ट्रकचालक सातत्याने ट्रक आडवा मारून पोलिसांना पुढे येण्यास मज्जाव करीत होता त्यानंतर पाठलाग चालू असतानाच याची माहिती भिगवण पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस -पाटिल व त्यांचे सोबत असलेल्या अंमलदार यांना कळवून ट्रकला रोखण्यासाठी मदत मागितली.संशयीत ट्रकचालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक सोलापुर- पुणे महामार्गावर लोणीदेवकर- पळसदेव मार्गे डाळज नं. २ येथे हॉटेल देवा फुडस्चे समोर पुणे बाजुकडुन सोलापुर बाजुकडे जाणाऱ्या लेनवर रोडच्या बाजुस अंदाजे रात्री ०२:३० वा. चे. सुमा. लावुन सदर ट्रकचा चालक व त्याचा एक साथीदार रोडलगत असणाऱ्या उसाच्या उभ्या पिकात अंधाराचा फायदा घेवून पळून गेले.

तसेच भिगवण पोलीस ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षक दडस- पाटिल व त्यांचे सोबत असलेल्या रात्रगस्तचे अंमलदार यांनी सदर ट्रकची पाहणी करता ट्रकच्या मागील हौदयात चोरीचे डिझेल भरलेले कॅन व डिझेल चोरीसाठी वापरण्यात येणारा पाईप मिळुन आला. सदर ठिकाणी मिळुन आलेल्या ट्रकचे व त्यामध्ये एकुण १०,२४,२६०/- रू. किंमतीचे डिझेल व ट्रक जप्त करून सदर ट्रक नं. MP-09 HG 0806 वरील अज्ञात चालक व त्याचा साथीदार यांच्या विरूध्द इंदापुर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ८८४/२०२१ भादवि क ३५३,३७९,३४ मो.वा.का.क १८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आहे.ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे इंदापूर पोलीस निरीक्षक तयुब मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एम.
ए.माने हे करत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *