फलटण शहरात आयपीएल सट्टाप्रकरणी पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल…!!


फलटण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

फलटण शहरात आयपीएल क्रिकेट मॅचवर मोबाईलद्वारे सट्टा व मटका घेतल्याप्रकरणी पाच जणांविरुध्द फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ९५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.यावेळी केवल हरिश्चंद्र वाघमारे (रा.मारवाड पेठ, फलटण),राकेश राजेंद्र तेली(रा. तेली गल्ली,फलटण)अमर अनिल पिसाळ (रा.बुधवार पेठ,फलटण) किशोर आनंदा घोलप व आदित्य अशोक शिंदे हे आयपीएल क्रिकेट मॅचवर मोबाईलद्वारे ग्राहकांची नावे व भाव घेऊन पैशाचे हार जीत वर जुगार व सट्टा खेळताना तसेच मटका लोकांकडून रोख व मोबाईलद्वारे पैसे घेताना आढळून आले.

यावेळी पोलिसांनी ५ हजार रुपयांची रोख रक्कम,९० हजार रुपये किंमतीचे चार अँड्रॉईड,पेन मोबाईल,कॅल्क्युलेटर,चिठ्या व एक सॅक असा ९५ हजार ६६५ रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.याबाबतची फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल सुजित मेंगावडे यांनी दाखल केली आहे.ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल,अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजित बोराडे,पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भारत किंद्रे,पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ,सहायक पोलिस निरीक्षक एस.के.राऊळ व पोलिस कर्मचाऱ्यांनी केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *