गोजुबावीतील व कटफळ मधील शेतकऱ्यांनी पाडले पालखी महामार्गाचे काम बंद…
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
बारामती एमआयडीसी भागात असलेल्या गोजुबावी मधील व कटफळ मधील नागरिकांनी जमिनीला चांगला भाव मिळत नसल्याने संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम बंद पाडत प्रशासनाचा जाहीर निषेध नोंदवला.संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग चे काम प्रगतीपथावर असताना हे काम बंद पाडण्यात आले,शेतकऱ्यांना या अगोदर प्रति गुंठा चार लाख सहा हजार रुपयांप्रमाणे पैसे देण्यात येतील अशा नोटीसा देण्यात आल्या होत्या,परंतु पुन्हा एकदा शेतकऱ्यांना नवीन नोटीस मिळाली असून,यामध्ये निवाडा दुरुस्त करून बेकायदेशीरपणे ही नोटीस पाठवली आहे.परंतु महामार्ग कायद्यानुसार सहा महिन्यानंतर निवडा दुरुस्ती करता येत नाही,असे असताना दोन वर्षानंतर निवाडा दुरुस्त करून गावातील शेतकऱ्यांना आज रोजीच्या बाजार भावापेक्षा कमी किंमतीच्या नोटिसा पाठवल्या आहेत.
त्यामुळे सर्व शेतकरी संतप्त झाले व सदर शेतकऱ्यांनी महामार्गाचे चालू झालेले काम बंद पाडले.यामध्ये शेतकऱ्यांनी यासंदर्भात बारामतीचे उपविभागीय अधिकारी यांना २९सप्टेंबर रोजी अर्ज दिला होतातरीही काम सुरु ठेवल्याने शेतकऱ्यांनी प्रशासनाचा निषेध नोंदवला.यामध्ये पूर्वीच्या निवाड्यानुसार शेतकऱ्यांना मोबदला देऊन बेकायदेशीरपणे दुरुस्त केलेला निवाडा रद्द करण्यात यावा.शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळाल्याखेरीज काम चालू करू नये.असा पत्रव्यवहार करून देखील उपविभागीय अधिकाऱ्यांनी दडपशहीने काम सुरू ठेवले असल्याचा आरोपी देखील माहिती शेतकऱ्यांकडून करण्यात आला.जोपर्यंत पुर्वीच्या नोटीसीप्रमाणे भाव मिळत नाही तोपर्यंत काम सुरु होऊ देणार नाही असा निर्धार देखील कटफळ व गोजुबावीतील शेतकऱ्यांनी केला आहे.