धुळे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
शिरपुर तालुका पोलीस ठाण्याच्या हददीतील महादेव दोंडवाडा याने गावाच्या शिवारात एका शेतात गांज्यासदृश अंमली पदार्थाच्या झाडांची बेकायदेशीर लागवड केलेली आहे,अशी माहिती मिळाली असता,शिरपुर पोलीस ठाणे,स्थानिक गुन्हे शाखा व आर.सी.पी.पथक अधिकारी व कर्मचारी याचे पथक तयार करून हे अतिशय दुर्गम,डोंगराळ भागात असल्याने तेथे काही अतंर पायी जावे लागले असुन,हे ठिकाण महादेव दोंडवाडा गावाचे पुर्वेस ५ कि.मी.अंतरावर असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या वनजमीनीवरील एका शेतात होते.या ठिकाणी सांयकाळी ४.३० वाजेच्या सुमारास पोहचले असता तेथे शेतात गांजा सदृश्य अंमली पदार्थाच्या झाडांची केलेली दिसुन आल्याने सदर शेतावर शिरपुर तालुका पो.स्टे.पथक व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी संयुक्त कारवाई केली.
शेतातुन चार लाख चौदा हजार किंमताचा २०७ किलो २०० ग्रॅम वजनाचे गांजा सदृश्य अमली पदार्थांचे हिरवे ओले ताजे झाडे , पाने व फांदया असलेले झाडे मुळांसह,मुळा पासुन ते शेंडया पर्यंत उंची अंदाजे ३ ते ५ फुटापर्यत कमी जास्त असलेले प्रतिकिलो २००० किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.ही वनजमीन महादेव दोंडवाडा याच्या मालकीची असल्याने पोलीस हवालदार प्रकाश मिल यांच्या फिर्यादीवरुन एनडीपीएस कायदा कलम २० व २२ प्रमाणे शिरपुर तालुका पो.स्टे. येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई धुळ्याचे पोलीस अधिक्षक प्रविणकुमार पाटील अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव,उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपुर अनिल माने, स्थागुशाचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपुर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शीरसाठ,पोलीस हवालदार भिकाजी पाटील,नरेंद्र खैरनार, लक्ष्मण गवळी,राजेंद्र मांडगे, संजय माळी,संजय देवरे,जाकीर शेख,चत्तरसिंग खसावद,रणजीत वळवी,योगेश मोरे,प्रकाश भील, संतोष पाटील व स्थानिक गुन्हे धुळे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील,पोलीस हवालदार योगेश राऊत,रफीक पठाण,श्रीकांत पाटील,प्रभाकर बैसाणे,अशोक पाटील,संदीप सरग,योगेश चव्हाण,पंकज खैरमोडे,गौतम सपकाळे,राहुल सानप,कमलेश सुर्यवंशी, मधु पाटील,महेंद्र सपकाळ,प्रशांत माळे,किशोर पाटील,श्रीशैल जाधव,तुषार पारधी,राहुल गिरी, गुलाब पाटील तसेच आर.सी.पी. पथकाचे दादाभाई बोरसे,भटु साळुंखे, रणजीत मंगलदास साळुखे,सुशिल पाटील,प्रविण निकुंभे,
रामचंद्र मोरे,दिनेश सोनवणे,अशोक माळी,चालक संतोष मोरे, महेंद्र जाधव यांनी केली आहे.या गुन्हयाचा तपास पोसइ भिकाजी पाटील हे करीत आहेत.