ड्रग्ज पार्टी प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान NCB च्या अटकेत…!! आर्यनला दिली एक दिवसाची NCB कोठडी..!!


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याच्या मुलाला एका ड्रग्ज
पार्टीत एनसीबीने अटक केली असून,त्याला कोर्टात हजर केले असता आर्यन खानसह,अरबाज मर्चंट आणि मुनमून यांनाही एका दिवसाची पोलीस कोठडी (NCB) कोठडी सुनावण्यात आली आहे.त्यामुळे आता या रेव्ह पार्टीची एकच चर्चा सुरू झाली असून या रेव्ह पार्टीबाबतची धक्कादायक माहिती समोर येत आहे.समुद्रात जहाजावर ही पार्टी तीन दिवस रंगणार होती.मात्र त्याआधीच होती,एनसीबीने हा बेत उधळून लावला असून,तीन दिवसात जहाजावर नक्की काय होणार होत ? ही
रेव्ह पार्टी कशी रंगणार होती ? एनसीबीला कोकेन,एमडी,चरस सारखे ड्रग्स पार्टीत मिळाले आहेत.

त्यामुळे तपासासाठी दोन दिवसांची कस्टडी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मागितली होती,मात्र कोर्टाने एका आर्यन खानसह इतर दोघांना एका दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.या चौकशीत नेमकी काय माहिती बाहेर येते ते पाहणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे.ड्रग्ज प्रकरणाच्या लिंक कुठपर्यंत जातात ते आता तपासातून समोर येईल.उर्वरित पाच आरोपींना पोलीस कोर्टात कधी हजर करतात हे पाहावं लागणार आहे.आरोपीच्या बाजूने ज्येष्ठ वकील सतीश माने-शिंदे यांनी कोर्टात बाजू मांडली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *